पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
भालचंद्र अहिरकर (35), अर्जुन शेळके (40) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दोघेही पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथील रहिवासी आहेत. हा अपघात सोमाटणे फाटा येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथून आहिरकर आणि शेळके दुचाकीवरून जात होते. दरम्यान भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत सुरू केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community