FIR On Sudhir Chaudhary : ठाकरे सरकारकडून अर्णव गोस्वामी; आता कर्नाटक काँग्रेस सरकारकडून सुधीर चौधरी टार्गेट 

150
FIR On Sudhir Chaudhary : ठाकरे सरकारकडून अर्णव गोस्वामी; आता कर्नाटक काँग्रेस सरकारकडून सुधीर चौधरी टार्गेट
FIR On Sudhir Chaudhary : ठाकरे सरकारकडून अर्णव गोस्वामी; आता कर्नाटक काँग्रेस सरकारकडून सुधीर चौधरी टार्गेट

उद्धव ठाकरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रकाश टाकल्यामुळे शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली होती. (FIR On Sudhir Chaudhary) तोच कित्ता आता कर्नाटकातील काँग्रेस सरकार गिरवत आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीचे वृत्त निवेदक आणि पत्रकार सुधीर चौधरी यांनी अल्पसंख्यांकांना व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सबसिडी देण्याच्या योजनेसंबंधी वृत्त देतांना अशा योजना हिंदूंसाठी का रावबल्या जात नाहीत, असा साधा प्रश्न उपस्थित केला. ज्याच्यामुळे काँग्रेस सरकारने द्वेषपूर्ण भावनेने आता सुधीर चौधरी याना गजाआड करण्याचा घाट घातला आहे.

कर्नाटकच्या अल्पसंख्यांक मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सुधीर चौधरी यांच्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात अल्पसंख्याकांसाठी व्यावसायिक वाहन अनुदान योजनेबद्दल जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (FIR On Sudhir Chaudhary)

(हेही वाचा – Parliament New Building : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी नव्या संसदेवर फडकणार झेंडा)

काय आहे योजना 

कर्नाटक सरकारने या योजनेत 4.5 लाख रुपयांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या धार्मिक अल्पसंख्यांकांना व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्याचे वचन दिले आहे. कर्नाटकात मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख आणि पारशी या पाच समुदायांना धार्मिक अल्पसंख्याक म्हणून वर्गीकृत केले आहे. या योजनेविषयी सुधीर चौधरी यांनी माहिती देताना “कर्नाटकमधील अल्पसंख्यांकांसाठी सबसिडी पण हिंदूंसाठी नाही ?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सुधीर चौधरी यांचे प्रत्युत्तर 

या प्रकरणी सुधीर चौधरी यांनीही एका ट्विटद्वारे कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या या कृतीला प्रत्युत्तर दिले आहे. सुधीर चौधरी यांनी म्हटले आहे की, ”कर्नाटकातील काँग्रेस सरकारने माझ्याविरुद्ध एफआयआर केल्याची माहिती मिळाली. या प्रश्नाचे उत्तर म्हणून एफआयआर ? तेही अजामीनपात्र कलमांसह ? म्हणजे अटकेची पूर्ण तयारी झाली आहे.
माझा प्रश्न होता की, स्वावलंबी सारथी योजनेत हिंदू समाजाचा समावेश का नाही ? या लढतीसाठी मीही तयार आहे. आता कोर्टात भेटणार !”

प्रियांक खरगे यांना पोटशूळ; कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी

कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान (आयटी/बीटी) मंत्री प्रियांक खरगे यांनी यावर आक्षेप घेऊन सामाजिक माध्यमात पोस्ट केली आहे की, ”योजनेचे सादरीकरण अशा प्रकारे करणे जाणीवपूर्वक केले आहे. सरकार आवश्यक कायदेशीर कारवाई करेल.”

दरम्यान सुधीर चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची चेतावणी देणारे प्रियांक खरगे यांनी नुकतेच तामिळनाडूचे द्रमुकचे नेते आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे समर्थन केले होते. त्या प्रकरणी खरगे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या FIR ची प्रत सुधीर चौधरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून प्रसारित केली आहे.

सामाजिक माध्यमांवर काँग्रेसवर टीका

या प्रकरणी काँग्रेसने सुधीर चौधरी यांच्याविषयी केलेल्या या द्वेषपूर्ण कृतीविषयी सामाजिक माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काही वापरकर्त्यांनी हिंदूंविषयी बोलणे चुकीचे आहे का, असा प्रश्न विचारला आहे. (FIR On Sudhir Chaudhary)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.