CM Eknath Shinde :’त्या व्हायरल’ व्हिडिओ बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले स्पष्टीकरण

मात्र मागील दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओवरून या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे.

176
CM Eknath Shinde :'त्या व्हायरल' व्हिडिओ बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले स्पष्टीकरण
CM Eknath Shinde :'त्या व्हायरल' व्हिडिओ बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले स्पष्टीकरण

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता राज्यातील पक्षफुटीच्या सुनावणीची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेतील दोन्ही गटांची सुनावणी लवकरच होणार असून त्याअनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत.मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वारंवार सांगितलं आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंतीही केली. मात्र मागील दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओवरून या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे.

एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण 
एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद सोशल मीडीया वर चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे.

(हेही वाचा :BJP Govt : भाजप सरकारच्या काळात निवडणुकीबाबत घेण्यात आले ‘हे’ क्रांतीकारी निर्णय)

लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम
शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामुन काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतियश निंदनीय असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचं शिंदे यांनी म्हटलं.आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलताना दिसत आहेत. हे कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.