Indian Army General Manoj Mukund Naravane : अखेर कोणाला तरी चीनचा खरा नकाशा मिळाला

माजी लष्कर प्रमुखांनी पुढे आणला चीनचा खरा नकाशा!

248
Indian Army General Manoj Mukund Naravane : अखेर कोणाला तरी चीनचा खरा नकाशा मिळाला
Indian Army General Manoj Mukund Naravane : अखेर कोणाला तरी चीनचा खरा नकाशा मिळाला

भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी चीनचा एक नकाशा ट्विट करून ‘अखेर कोणाला तरी चीनचा खरा नकाशा मिळाला’ असे लिहिले आहे. तसेच चीनला त्याची खरी जागा दाखवली आहे असेही त्यांनी लिहिले आहे. भारत आणि चीनमधील संबंध कायम तणावाचे राहिले आहेत. भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान जम्मू-काश्मिरच्या गलवान खौऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हा तणाव आणखी वाढला आहे. त्यातच चीनने काही दिवसांपूर्वी एक प्रातिनिधिक नकाशा जाहीर केला होता. त्यावरुन चीनवर भारताने ताशेरे ओढले होते. आता भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी चीनचा एक नकाशा जाहीर करुन चीनला त्याची जागा दाखवली आहे. ( Indian Army General Manoj Mukund Naravane)

मनोज नरवणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. अखेर कोणाला तरी चीनचा खरा नकाशा मिळाला असं ते ट्विटरवर म्हणाले आहेत. या फोटोमध्ये चीनला वेगवेगळ्या रंगामध्ये दाखवण्यात आले आहे. तिबेट, मंगोलिया, मंचुरीया, पूर्व तुर्कस्तान हे भाग चीनने गिळंकृत केल्याचं दाखवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी चीनने एक नकाशा जाहीर केला होता. यामध्ये चीनने अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग आपल्या देशाचा भाग असल्याचं दाखवलं होतं. यामुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारताने याचा निषेध करत चीनला सुनावलं होतं. त्यानंतर आता माजी लष्कर प्रमुखांनीही चीनला त्याची जागा दाखवल्याचं बोललं जातंय.

(हेही वाचा : Maratha Reservation : अखेर मनोज जरांगे पाटील यांना भेटायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जालन्यात येणार)
चीनने कायम विस्तारवादी भूमिका घेतलेली आहे. चीनचा आपल्या जवळपासच्या सर्व देशांशी सीमावाद आहे. चीनने तिबेटचा भाग ताब्यात घेतला आहे. तेथिल दलाई लामा यांना निर्वासिताचे जीवन जगावे लागत आहे. दुसरीकडे चीनचा आता तैवानवर डोळा आहे. चीनने तैवान हा एकेकाळी आपलाच भाग असल्याचा दावा करत तेथे अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. तैवानने चीनला विरोध केल्याने या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.