Nilesh Rane : निलेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण, ट्वीट करत दिली माहिती

214
Nilesh Rane : निलेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण, ट्वीट करत दिली माहिती

सतत चर्चेत असणारे निलेश राणे (Nilesh Rane) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी ते कोणत्याही राजकीय कारणासाठी नाही तर त्यांच्या तब्येतीसाठी चर्चेत आले आहेत. निलेश राणे यांना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटर वरून याची माहिती दिली आहे.

सध्या राज्यात इन्फ्लूएंझा व्हायरस (Influenza Virus) अनेकांना आपल्या विळख्यात अडकवत असल्याचं पाहायला मिळतंय.

(हेही वाचा – Asian Games Football Team : आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या फुटबॉल संघात छेत्री एकमेव ओळखीचा चेहरा, स्टायमॅकविषयी निर्णय नाही)

भाजप खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “10 तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये Influenza Virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (Lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही.”

H3N2 ची लक्षणं काय?

– ताप येणं
– त्वचा उबदार आणि ओलसर होणं
– चेहरा लाल होणंं
– डोळे पाणावणं
– सर्दी, अंगदुखी, कफ नसलेला खोकला, डोकेदुखी होणं

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.