Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी; दोन्ही गटांचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार

ठाकरे गट वकीलांमार्फत भूमिका मांडणार

209
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी; दोन्ही गटांचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी; दोन्ही गटांचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार

शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या (Shinde Group) ४० आमदारांची आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांची सुनावणी(Shiv Sena MLA Disqualification Case ) सुरू होणार आहे. गुरूवारी ,(१४ सप्टेंबर) सुनावणीची ही प्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर म्हणजेच, सर्व शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीला बुधवारी दुपारी बारा वाजता सुरुवात होईल. राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्व ५४ आमदारांची सुनावणी होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल ३४ याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल.

(हेही वाचा :Manik Bhide : जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे कालावश)

प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावण्यात येणार आहे.
शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार, सर्वोच्च न्यायालयानं निकाल लिहून दिलाय; अनिल परबांचा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार असा निकाल सुप्रीम कोर्टानं लिहून दिला आहे .                      फक्त निकाल यायचा बाकी असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय. तसंच सरकार पडणार होतं हे भाजपला आधीच माहित असल्यानं त्यांनी राष्ट्रवादी फोडली असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.