Manoj Jarange Patil : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जे जे फायदे ओबीसींना मिळत आहेत. ते फायदे आपल्या समाजाला देण्याचं काम आपण करत आहोत

129
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर अखेर १७व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची सराटी गावात आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उत्तरादाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोज पाटील यांचे उपोषण सोडल्याबद्दल आभार मानले. मनोज जरांगे पाटील व आंदोलकांची मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आहे तीच प्रामाणिक भूमिका सरकारची आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात चालू असणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. “जे जे फायदे ओबीसींना मिळत आहेत. ते फायदे आपल्या समाजाला देण्याचं काम आपण करत आहोत. आपलं रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. त्यासाठी जे काही चालू आहे, त्यावर मी स्पष्टपणे बोलू इच्छित नाही. जस्टिस कमिटी त्यावर काम करत आहे. मराठवाड्यातील ज्यांच्याकडे जुनी प्रमाणपत्रं असतील, नोंदी असतील, काहींकडे नसतील. त्यासाठीच आपण जस्टिस कमिटी स्थापन केली.

(हेही वाचा : MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; वकिलांना बोलू द्यायचे की नाही, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार)

जेणेकरून न्यायालयात काय टिकेल, काय नाही टिकणार याची माहिती त्यांच्याकडे असते.यापूर्वी देखील सरकारने मराठा समाजाला आरक्षण १६ आणि १७ टक्के दिले होते आणि त्यावेळेस आपण पाहिलं एकदा ऑर्डर काढली व मी  हायकोर्टला   दिला परंतु नंतर आपण नीट  आयोगाचे अहवाल तयार केला आणि कायदा केला आणि तो कायदा १२-१३% हायकोर्टाने कन्फर्म केला म्हणजे हायकोर्टामध्ये आपला आरक्षण टिकले. त्या बैठकीमध्ये देखील लिस्ट मंडळांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे मी त्याच्यावर आता भाष्य करत नाही. मला दिल्लीतही लोकांनी विचारले की हे मनोज जरांगे कोन हैं ? आणि तो किस्सा सांगितल्यावर लोकांमध्ये एकच हशा पिकला.

मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचेही केले कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतानाच “मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची क्षमता, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता राज्यात कुणामध्ये असेल, तर ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.

प्रकृतीची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्याची विनंती
माझी एवढी विनंती आहे मी जेव्हा जेव्हा मनोज ला फोन करायचा तेव्हा काय म्हणायचं तब्येत प्रकृती काळजी घे तर तुम्ही सगळे सहकारी याची काळजी घ्यायला पाहिजे. कलेक्टर आणि एसपी ला मी काय सांगायचं त्यांना विचार बाकी सगळे होत राहील पण मनोज ची तब्येत बिघडता कामा नये. पहिल्यांदा हॉस्पिटल मध्ये दाखल हो असे अतिशय कळकळीने शिंदे यांनी मनोज यांना सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.