ऋजुता लुकतुके
मेटा कंपनीने ‘व्हॉट्सॲप चॅनल’ (WhatsApp Channels) ही नवीन सेवा सुरू करण्याचा घाट घातला आहे. सुरुवातीलाच १५० देशांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ब्रॉडकास्ट म्हणजे प्रक्षेपण प्रकारातील ही सेवा असेल. यात तुमचे लाडके सेलिब्रिटी किंवा आवडता संघ तसंच अध्यात्मिक गुरू यांचे संदेश थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर प्रसारित होतील.
now that we’ve started channeling… who do you want to see on channels? 🤔
we’ll start @netflix
— WhatsApp (@WhatsApp) September 13, 2023
मेटा कंपनीच्या सोशल मीडिया ॲपवर (WhatsApp Channels) ग्राहकांची संदेशांची देवाणघेवाण वाढावी (एंगेजमेंट) यासाठी कंपनीचा हा प्रयत्न आहे. चॅनल सेवेमुळे कंटेन्ट क्रिएटरना एक नवीन व्यासपीठ मिळेल, असं कंपनीला वाटतंय. त्यांनी जून महिन्यातच प्रायोगित तत्त्वावर जपान आणि कोलंबिया देशांमध्ये ही सेवा सुरूही केली आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : अखेर १७ दिवसांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे)
व्हॉट्सॲपने आपल्या ट्विटर खात्यावर एका भारतीय चॅनलचं (WhatsApp Channels) उदाहरणही दिलं आहे. ते तुम्ही इथं पाहू शकता,
new channel alert 🚨 start channeling katrina kaif https://t.co/hyW6Urth1f pic.twitter.com/iT25kjunHC
— WhatsApp (@WhatsApp) September 14, 2023
तसंच इन्स्टाग्रामवर ब्रॉडकास्ट चॅनल (WhatsApp Channels) हे फिचरही कंपनीने दिलेलं आहे. या प्रयोगांच्या यशानंतर आता त्यांनी व्हॉट्सॲप चॅनल सेवेचा विस्तार करण्याचं ठरवलंय. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. सध्याचं व्हॉट्सॲप चॅट आणि चॅनल हे दोन वेगळे प्रकार असून चॅनलवर फॉलोअर्स एकमेकांना दिसत नाहीत. तुम्ही राहात असलेलं ठिकाण आणि लोकप्रियता या निकषांवर कंटेन्ट क्रिएटर्सचे संदेश तुमच्या फिडमध्ये येतात. पण, तुम्ही त्यावर व्यक्त होऊ शकता. म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यासाठी इमोजींचा आधारही तुम्ही घेऊ शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community