Importing iPhone? आयफोन बाहेरून आयात केला तर फायदा होतो का?

आयफोन भारतात तयार होत नाही. त्यामुळे इथल्या त्याच्या किमती नेहमी इतर अनेक बाजारपेठांपेक्षा चढ्या आहेत. भारतात जो आयफोन ७९,००० रुपयांना मिळतो, तोच अमेरिकन ६७,००० रुपयांना मिळतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

217
Importing iPhone? आयफोन बाहेरून आयात केला तर फायदा होतो का?
Importing iPhone? आयफोन बाहेरून आयात केला तर फायदा होतो का?

ऋजुता लुकतुके

आघाडीची मोबाईल फोन उत्पादक कंपनी ॲपलच्या वार्षिक सभेची उत्सुकता दरवर्षी सगळ्यांना असते. कारण, या बैठकीत कंपनी नवीन आयफोनचं मॉडेल प्रसिद्ध करत असते. यंदाही आयफोन १५ आणि ॲपल वॉचची नवीन मॉडेल कंपनीने लाँच केली आहेत.

हा सोहळा संपला की जगभरात ग्राहकांची घालमेल सुरू होते ती आयफोन भारतातच खरेदी करायचा की, बाहेरच्या देशातून आयात करायचा किंवा एखाद्या मित्राला परदेशातून तो आणायला सांगायचा हे ठरवण्यासाठी. भारतात काय किंवा परदेशात काय आयफोनच्या नेमक्या किमती काय आहेत, हे समजून घेऊया…

आयफोनच्या भारतातील आणि परदेशातील किमती 

नुकत्या लाँच झालेल्या आयफोन १५ सीरिजविषयी जाणून घेऊया. त्यासाठी अमेरिका आणि दुबई या जगातील मुख्य बाजारपेठा आपण विचारात घेऊ. कारण, इथं आयफोन तुलनेनं स्वस्त आहेत. आणि या बाजारपेठांमध्ये पोहोचणंही शक्य आहे. आयफोन १५ चं १२८ जीबींचं सगळ्यात लहान मॉडेल भारतात ७९,९०० रुपयांना उपलब्ध आहे. तेच मॉडेल अमेरिकेत ६९९ अमेरिकन डॉलरपासून सुरू होतं. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुरू होते ६६ हजार रुपयापासून.

आयफोन १५ ची दुबईतील किंमत स्थानिक दिरहम या चलनात आहे ३,३९९ म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे ७६,००० रुपये. तर चीनमध्ये हीच किंमत आहे ५,९९९ युआन, म्हणजेच ६६ हजार रुपये. जिथे आयफोनचं उत्पादन होतं, तिथे या किमती तुलनेनं कमी असलेल्या आढळतील.

आयफोनच्या जास्त महाग मॉडेलमध्ये हा फरक आणखी वाढत जातो. जसं की, प्लस मॉडेल भारतात ८९,००० रुपयांना उपलब्ध आहे. तेच अमेरिकेत ८९९ अमेरिकन डॉलर म्हणजे ७४,००० रुपये. तर दुबईत हेच मॉडेल भारतीय रुपयांमध्ये साधारण ८५,००० रुपये तर चीनमध्ये ८०,००० रुपयांत उपलब्ध होतं. तर आयफोन प्रो मॉडेलची भारतातील किंमत १,३४,००० रुपये इतकी आहे. तेच अमेरिकेत हे मॉडेल ९९९ अमेरिकन डॉलरनी सुरू होतं. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये किंमत जाते ८२,००० रुपयांच्या घरात. दुबईत या मॉडेलची किंमत भारतीय रुपयांमध्ये ९६,००० रुपये तर चीनमध्ये ९२,००० रुपये बसेल.

(हेही वाचा- Change In Pension Rule : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचे लाभ नाहीत)

आयफोन मॅक्स-प्रो मॉडेलची भारतातील किंमत १,५९,००० रुपये इतकी आहे. अमेरिकेत ही किंमत भारतीय रुपयांमध्ये ९९,००० रुपयांमध्ये बसेल. तर दुबईत १,१५,००० आणि चीनमध्येही ती साधारणपणे तितकीच असेल.

अर्थात, यामध्ये ॲपल कंपनीने देऊ केलेल्या कुठल्याही सवलती किंवा जुने फोन एक्सचेंज करताना मिळणारी सूट धरली नाहीए. साधारणपणे ॲपल कंपनीचेच जुने फोन एक्सचेंज करताना कंपनी बऱ्यापैकी सवलत देऊ करते. याशिवाय काही क्रेडिट कार्डांच्या वापरावरही तुम्हाला सूट मिळू शकते. ठरावीक दुकांनांमधून आयफोन खरेदी केल्यास सवलत मिळू शकते. इतकंच नाही तर आयफोनचे बाहेरच्या देशातील दर सांगताना त्यात आयात शुल्क धरलेलं नाही. तुम्ही आयफोन आयात करणार असाल तर त्यावर बसणाऱ्या आयात शुल्काचा विचारही तुम्हाला करावा लागेल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.