विशाखापट्टनमवरून मुंबईला येणारे विमानाचा लॅंडिंग करताना मोठा अपघात झाला आहे. (Accident On Mumbai Airport) खराब हवामानामुळे विमान लॅंडिंग करताना क्रॅश होऊन त्याचे अक्षरशः २ तुकडे झाले आहेत. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्ससह 8 जण प्रवास करत होते.
(हेही वाचा – Raj Thackeray : जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; राज ठाकरे म्हणाले, ‘मराठा समाजातील तरुण अस्वस्थ…’)
या घटनेनंतर मुंबई विमानतळावरील सर्व विमान वाहतूक पुढील सूचनामिळेपर्यंत बंद करण्यात आलेली आहे. मुंबई विमानतळावरील वाहतूक सध्या अन्य विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आली आहे.
व्हीएसआर व्हेंचर्सचे लेसरजेट 45 VT-DBL हे विमान विझाग ते मुंबई असा प्रवास करत होते. दिलीप बिल्डकॉन या इन्फ्रा कंपनीच्या मालकीचं आहे. त्या वेळी मुंबई विमानतळावरील धावपट्टी क्रमांक 27 वर उतरत असताना हा अपघात झाला. खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाला असे सांगितले जात आहे. (Accident On Mumbai Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community