मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या दक्षता पथकाने सोनं तस्करी प्रकरणी सिंगापूर येथून मुंबईत आलेल्या एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्यानी स्वतःच्या अंतर्वस्त्रात आणि सोबत असलेल्या तीन मुलांच्या डायपरमध्ये लपवून आणलेली कोट्यवधी रुपयांची सोन्याची धूळ (पावडर) जप्त केली आहे. सीमा शुल्क विभागाने या जोडप्यावर गुन्हा दाखल करून जोडप्याला अटक केली आहे.
सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने सिंगापूरहून येणाऱ्या एका भारतीय कुटुंबाला संशयावरून ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. दरम्यान, या जोडप्याकडून २४ कॅरेटची दोन किलो सोन्याची पावडर जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या पावडरची किंमत सुमारे जवळपास १ कोटी ५ लाख रुपये आहे.
(हेही वाचा – Marathi Marginalized : नाशिकमध्ये मराठी भाषिक उपेक्षित; कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमात प्रवेश नाकारला )
मुंबई सीमाशुल्क विभागाने सांगितले की, प्रवाशांनी तस्करीचे सोने त्यांच्या अंतरवस्त्रात आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाच्या डायपरमध्ये लपवले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे कुटुंब इंडिगोच्या ६-ई १०१२ या विमानाने सिंगापूरहून मुंबईत आले होते आणि मुंबईहून चेन्नईला जाणार होते, अटक करण्यात आलेले जोडपे हे भारतीय नागरिक आहेत. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community