Sunlight : उन्हामुळे काळवंडला चेहरा? ‘या’ टिप्स करा फॉलो

231

कडाक्याच्या उन्हात (Sunlight) जास्त वेळा बाहेर राहिलो तर त्वचा टॅन होण्याची समस्या उद्भवते. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही वेळेस चेहऱ्यासाठी हजारो रुपयेही खर्च केले जातात, पण फायदा होतोच असं नाही.अनेक वेळा तर लोकं स्वतःहून त्यांच्या चेहऱ्यावर स्टिरॉइड क्रीम लावतात, ज्यामुळे नंतर अनेक दुष्परिणाम होतात. अशा परिस्थितीत सूर्यप्रकाशामुळे होणारा टनिंग कसा दूर करायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो केल्यास फायदा होऊ शकतो. सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने त्वचेच्या टॅनिंगची समस्या उद्भवते, असे डॉक्टर सांगतात.

सूर्याच्या (Sunlight) प्रखर यूव्ही किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करता येतो. अशा वेळी एसपीएफ 30 पेक्षा अधिक सनस्क्रीन वापरले पाहिजे. हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते, परंतु त्वचा अधिक संवेदनशील असेल तर एसपीएफ 30 पेक्षा कमी वापरावे. मात्र नेहमीच सूर्यकिरणांपासून लांब राहू नका. सकाळच्या वेळी कोवळे ऊन अंगावर घेऊ शकता. चेहरा टॅनिंगपासून वाचवायचा असेल तर चेहऱ्यावर मास्क लावून तो कव्हर करावा आणि मग उन्हात जावे. पुरेसे ऊन मिळाले नाही तर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होऊ शकते.

(हेही वाचा Bademiya : कुलाब्यातील ७६ वर्षे जुने बडेमियाॅं हॉटेलच्या किचनमध्ये झुरळ आणि उंदराचा वावर; एफडीएने ठोकले टाळे)

स्वत:हून कोणतेही क्रीम लावू नका

तज्ज्ञ सांगतात की, आजकाल सोशल मीडियाच्या जगात प्रत्येकाला सुंदर दिसावेसे वाटते. यामुळेच काही लोकं स्वत:च्या मनानेच मेडिकल स्टोअरमधून क्रीम खरेदी करतात आणि ते टॅनिंग दूर करण्यासाठी लावतात. या क्रीम्समुळे चेहरा काही काळ चमकतो, पण नंतर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. कारण या क्रीममध्ये भरपूर स्टिरॉइड्स असतात. ज्याचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

चेहऱ्याला टॅनिंगपासून वाचवायचे असेल तर उन्हात बाहेर जाताना चेहरा कव्हर करा. स्किन हायड्रेशनही फार गरजेचे आहे. त्यासाठी दिवसभरात कमीत कमी ८ ग्लास पाणी तरी प्यावे. त्वचेवर टॅनिंगची समस्या वाढत असेल तर स्वत: उपचार करू नका. या बाबतीत त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काही घरगुती उपायांच्या मदतीनेही तुम्ही टॅनिग दूर करू शकता. यासाठी चिमूटभर हळद मिसळलेले दही चेहऱ्यावर लावा, किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल वापरावे. आठवड्यातून दोनदा या पद्धती केल्याने काही वेळाने आराम मिळू शकतो

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.