Diet : तुम्हीदेखील विसरता छोट्या-मोठ्या गोष्टी? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

151

आपल्या मेंदूमुळे शरीराची संपूर्ण क्रिया चालते. त्यामुळे आरोग्यासह मेंदूची काळजी घेणेही महत्वाचे आहे. पण बऱ्याच वेळा मेंदूशी संबंध होणाऱ्या त्रासामुळे संपूर्ण शरीरावर आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि त्रास सहन करावा लागू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, लहानपणापासूनच मेंदूला चांगले पोषण मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे मुलांचा मेंदू तल्लख करण्यासाठी पालक त्यांना बदामासह अनेक पोषक पदार्थ खायला देतात. त्यासाठी आहारात तुम्ही आणखी कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता, ते जाणून घेऊया.

हिरव्या भाज्या 

हिरव्या भाज्या या फक्त आपल्या आरोग्यसाठीच (diet) चांगल्या नसतात तर मेंदूसाठीही फायदेशीर असतात. हिरव्या भाज्यांमध्ये बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन के आणि फॉलेट असते ज्यामुळे मेंदू ॲक्टिव्ह राहतो.

(हेही वाचा PM Modi On Sanatan Dharma : आज सनातन धर्मावर आघात करणारी I.N.D.I.A आघाडी उद्या देशावर आघात करेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात)

अंडही ठरतं फायदेशीर 

अंडी ही प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानली जातात. मेंदूच्या ताकदीसाठीही ती फायदेशीर असतात. अंड्यामध्ये कोलीन नावाचे तत्व असते जे मेंदू हेल्दी ठेवण्यात मदत करते.

बेरीज 

आंबट-गोड बेरी या खायला जितक्या चविष्ट असतात, तितक्याच त्या मेंदूसाठीदेखील फायदेशीर ठरतात. त्यात फ्लेवोनोइड्स असतात, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. त्याच्या नियमित सेवनाने फायदा मिळतो.

मासे 

मासे हा आपले शरीर व मेंदू दोन्हींसाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड मुबलक असते. ज्यामुळे मेंदूला फायदा होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.