राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात 3 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाला उपस्थित राहण्याचे आदेश हे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने राष्ट्रवादीत फुट पडली. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह नक्की कुणाचे असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता 3 ऑक्टोबरला सुनावणीत काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरूद्ध अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गटाच्या वतीने सर्वप्रथम निवडणूक आयोगाकडे दावा करण्यात आला की, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवार आहेत व पक्षाचे चिन्ह देखील आमचेचे आहे. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून देखील त्यासंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती.
यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीत फूट पडलेल्या दोन्ही गटाला पक्ष व चिन्हाबाबत सुनावणीसाठी 3 ऑक्टोबरला हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी 3 ऑक्टोबर हा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे.
(हेही वाचा I.N.D.I.A आघाडी 14 टीव्ही अँकर्सच्या कार्यक्रमावर टाकणार बहिष्कार)
तीन आठवड्याचा वेळ मागितली
शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवार यांनी केलेले सर्व दावे फेटाळले आहेत. त्यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांचा वेळ मागतला होता. पण त्यासंदर्भात आयोगाने त्यांना केवळ तीन आठवडे देऊन पुरावे सादर करण्याचे सांगितले होते. परिणामी समोर आलेल्या माहितीनुसार आता पक्ष व चिन्हाबाबत 3 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. अर्थात त्या दिवशी पुढील कार्यवाही कशी असेल याबाबत निश्चित होईल.
शिवसेनेसारखी स्थिती?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट निवडणूक आयोगात गेला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने जवळपास चार ते पाच सुनावणी घेत व दोन्ही गटाला पुरावे सादर करण्याचे सांगून शिंदे यांना पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.
Join Our WhatsApp Community