ऋजुता लुकतुके
आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) सुपर फोर लढतीत पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका लढतीत पावसाचा व्यत्यय आला. पण, त्यामुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. आणि अखेर लंकन संघाने तो ८ गडी राखून जिंकला. लंकन विजयाचा शिल्पकार ठरला ८७ चेंडूंमध्ये ९१ धावा करणारा कुसल मेंडिस आणि त्याने सदिरा समरविक्रमा बरोबर केलेली शतकी भागिदारी. समरविक्रमानेही बहुमोल ४८ धावा केल्या.
या दोघांमुळे लंकन संघाने २५२ धावांचं आव्हान ४२व्या षटकात पार केलं.
The Lions have stormed into the Super11 Asia Cup 2023 finals with an exceptional run chase. Kusal Mendis showcased impeccable skills with a 91-run innings, while Asalanka’s brilliant late blitz proved to be the game-changer! 🇱🇰#AsiaCup2023 #PAKvSL pic.twitter.com/yTaP7TxLog
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 14, 2023
सामना पावसामुळे लांबला आणि त्यात दोनदा मोठा व्यत्यय आला. त्यामुळे आधी सामना ४५ षटकांचा करण्यात आला. आणि मग तो ४२ षटकांचा करण्यात आला. तरीही शेवटचा चेंडू पडला तेव्हा श्रीलंकेच्या स्थानिक वेळेत एक वाजून दहा मिनिटं झाली होती.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली होती. सलामीवीर अब्दुल्ला शफिकने अर्धशतक करत पाकला मजबूत पायाभरणी करून दिली. आणि कर्णधार बाबर आझमने २९ धावा करून त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर महम्मद रिझवानने ७३ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. यात त्याने २ षटकार आणि ६ चौकार ठोकले. रिझवानने एक बाजू लावून धरल्यामुळेच पाकला अडिचशेचा टप्पा ओलांडता आला. तळाला येऊन इफ्तिकार अहमदने ४७ धावा केल्या. तर श्रीलंकेसाठी मथिशा पथिरानाने ३ तर मदुशानने २ बळी घेतले. पण त्यासाठी दोघांनी जास्त धावाही दिल्या.
(हेही वाचा-Ind Vs Bangladesh : जायबंदी श्रेयस अय्यर सरावासाठी मैदानात उतरला)
त्यानंतर श्रीलंकन डाव सुरू झाला तेव्हा निसांका (२९), कुसल परेरा (२७) हे सलामीवीर आणि त्यानंतर कुसल मेंडिस (९१) आणि समरविक्रमा (४८) या आघाडीच्या फळीने लंकन आव्हान कायम ठेवलं होतं. पण, त्यानंतर ३६व्या षटकात कुशल मेंडिस बाद झाला आणि तिथे पडझड सुरू झाली. पुढच्या ३० धावा जमवताना आणखी चार लंकन गडी बाद झाले. आणि लंकन डावाची अवस्था ८ बाद २४३ अशी झाली. यानंतर लंकन संघाच्या मदतीला धावून आला तो चरिथ असालंका. तो ४९ धावांवर नाबाद राहिला. आणि तळाच्या पथिरानावर फलंदाजीची वेळ न येऊ देता त्याने शेवटच्या चेंडूवर लंकन विजय साकारला.
Kusal Mendis at his finest! Despite falling short of a well-deserved century, he delivered a match-winning knock! #SLvPAK #AsiaCup2023 pic.twitter.com/0jbU6JgJDr
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 14, 2023
पाकिस्तानी गोलंदाज इफ्तिकार अहमदने ५० धावा देत ३ बळी घेतले. लंकन डावाला खिंडार त्यानेच पाडले. तर शाहीन शाह आफ्रिदीनेही मोक्याच्या क्षणी दोन बळी मिळवले. कुसल मेंडिसला सामना जिंकून देणाऱ्या ९१ धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या पराभवानंतर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर श्रीलंकन संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तिथे भारत विरुद्ध श्रीलंका अशी लढत होणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community