Water Reduction : नवी मुंबई आणि नाशिकरांवर पाणीसंकट! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार

116
Water Reduction : नवी मुंबई आणि नाशिकरांवर पाणीसंकट! 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
Water Reduction : नवी मुंबई आणि नाशिकरांवर पाणीसंकट! 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

नवी मुंबईकर आणि नाशिककमधील काही शहरांमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. खारघार, तळोजा, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटीमध्ये आज संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर शनिवारी दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जलशुद्धिकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सिडकोहून हेटवणे जलशुद्धिकरण केंद्र, जलवाहिनीवरील देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजामध्ये नळांना पाणी नसणार आहे.

नाशिकमध्ये शनिवारी म्हणजे 16 सप्टेंबरला दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा संपूर्ण दिवस बंद असणार आहे. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रातील उपकेंद्र आणि पंप हाऊसमध्ये विद्युतविषयक दुरुस्तीची कामे हाती घेणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक एकमधील संपूर्ण म्हसरुळ शिवार, प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधील संपूर्ण मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसर आणि प्रभाग क्रमांक तीनमधील हिरावाडी या भागात शनिवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही आहे, तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.