ऋजुता लुकतुके
फुटबॉल जगतासाठी हे वर्ष महिला आणि पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेचं होतं. आणि त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या फिफा पुरस्कार सोहळ्याची (FIFA Awards 2023) यंदाची शानही वेगळी असणार आहे. सहाजिकच नामांकन मिळालेले बहुतेक खेळाडू यंदाचा विश्वचषक गाजवलेले आहेत. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी यंदा तिहेरी लढत आहे ती लिओनेल मेस्सी, कायलन एमबापे आणि एरलिंग हालाड यांच्यात. महिलांच्या विश्वचषकात गोल्डन बूट मिळवणारी स्पेनची आयटाना बोनमाट्टीलाही महिलांच्या विभागात नामांकन आहे.
इंग्लिश प्रिमिअर लीग विजेत्या मँचेस्टर सिटी संघातील ६ खेळाडूंना फिफाच्या वार्षिक पुरस्कारासाठी नामांकनं मिळाली आहेत. तर संघाचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनाही नामांकन मिळालं आहे.
🏆 The Best FIFA Women’s Player
🏆 The Best FIFA Men’s Player
🏆 The Best FIFA Women’s Coach
🏆 The Best FIFA Men’s Coach
🏆 The Best FIFA Women’s Goalkeeper
🏆 The Best FIFA Men’s Goalkeeper
🏆 The FIFA Fan AwardVoting is now open for #TheBest 2023! 🗳
— FIFA (@FIFAcom) September 14, 2023
महिलांच्या विभागात विश्वचषक विजेत्या स्पेन संघाच्या चार खेळाडूंना नामांकनं मिळाली आहेत. तर खालोखाल ३ इंग्लिश खेळाडू आणि २ ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू नामांकनांच्या यादीत आहेत. सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या यादीत सरिना विगमन यांचं नाव चर्चेत आहे.
(हेही वाचा-Asia Cup 2023 : चुरशीच्या लढतीत पाकिस्तानला २ गड्यांनी हरवत श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत)
लिओनेल मेस्सी आणि महिलांमध्ये अलेक्सिया पुटेलस हे सध्याचे फिफा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार विजेते आहेत. नवीन नामांकनं आता जाहीर झाली आहेत. या खेळाडूंची निवड माजी फुटबॉलपटूंच्या एका पॅनलने केली आहे. या पॅनलमध्ये मिया हॅम आणि द्रोगबा हे ज्येष्ठ खेळाडू यंदा होते.
फिफाने (FIFA Awards 2023) नामांकनांची यादी जाहीर केल्यानंतर आता जगभरात फुटबॉल चाहते आपलं मत नोंदवू शकतात. फिफाच्या (FIFA Awards 2023) अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यासाठी चाहत्यांनी आपलं मत नोंदवायचं आहे. मतदान प्रक्रिया सुरूही झाली आहे आणि ती ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे. अंतिम विजेते दरवर्षीप्रमाणे चाहत्यांच्या मतांवरूनच ठरणार आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community