मुंबईचं आकर्षण असलेली डबलडेकर बस ! खालचा मजला वरचा मजला, अशी रचना. अबालवृद्धांपासून साऱ्यांनाच या बसने प्रवास करायला आजही आवडतो. ही बस मुंबईकरांचा निरोप घेणार की काय अशी चर्चा होती, मात्र डबलडेकर बस बंद होणार नसून जुलै 2024 पर्यंत नवीन डबलडेकर बसेस दाखल होणार आहेत.
सध्या 35 डबल डेकर बसेस असून त्यापैकी 16 डबल डेकर बसेस रस्त्यावर धावू लागल्या. भविष्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी तब्बल 900 वातनुकूलित डबल डेकर बसेस दाखल होणार आहेत. या बसगाड्या पर्यावरणपूरक असून त्यातून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होणार नाही. या गाड्यांमध्ये दोन्ही बाजूंनी स्वयंचलित प्रवेशद्वार असेल. त्यामुळे प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मोबाईल चार्जिंगची व्यवस्थाही आहे. बसभाडे नाममात्र असेल, अशी बेस्टकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Health Tips : चांगल्या आरोग्यासाठी ‘हे’ घटक महत्त्वाचे)
स्वीच मोबिलिटी या संस्थेला 200 बसगाड्या पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी 35 गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित बस मार्च 2024 पर्यंत प्राप्त होतील. त्याचप्रमाणे हरित मोबिलिटी या संस्थेला 700 एसी डबल डेकर पुरवण्यासाठी कार्यादेश दिला आहे.
प्रत्येक महिन्यात 100 बस
स्वीच मोबिलिटी या संस्थेकडून डिसेंबर 2023 मध्ये 50 बस आणि जानेवारी 2024 पासून जून 2024पर्यंत प्रत्येक महिन्यात 100 बस तसेच जुलै 2024 मध्ये 50 बस प्राप्त होतील. ही बस सेवा मुंबईतील विविध 12 आगारांतून चालवण्यात येतील.
नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या…
डबल डेकरमधून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने 21 फेब्रुवारी 2023 पासून वातानुकूलित डबल डेकर सुरू केल्या. विद्यमान डबल डेकर बसगाड्यांचे आयुर्मान संपल्यामुळे या बसगाड्यांच्या जागेवर नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या चालवल्या जात आहेत, असेही उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community