इस्रोने शनिवार २ सप्टेंबर रोजी आदित्य एल १ या (Aditya L1) यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावले. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांची बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.
अशातच आता भारताच्या सूर्यायानाने म्हणजेच आदित्य एल१ (Aditya L1) ने सूर्य मोहिमेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करुन या यानाने नव्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच, इस्रोने (ISRO) याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने म्हटलं आहे की, आदित्य एल १ अंतराळयानाने चौथा टप्पा म्हणजेच ‘अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. ‘अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ म्हणजे पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे अंतराळात प्रवास करण्यासाठी गती निर्माण करणे.
(हेही वाचा – Monsoon Update : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय; IMD कडून २४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट)
इस्रोने ट्विट करत सांगितले की, ‘फोर्थ अर्थ बाउंड मॅन्युव्हर (EBN#4)’ यशस्वी झाला आहे. इस्रोच्या मॉरिशस, बेंगळुरू, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर आणि पोर्ट ब्लेअरमधील ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून या उपग्रहाचा मागोवा घेण्यात आला. आदित्य एल १ साठी, फिजी बेटावरील वाहतूक करण्यायोग्य टर्मिनल अवकाशयानाला पोस्ट-बर्न ऑपरेशनमध्ये मदत करेल. आदित्य एल १ (Aditya L1) अंतराळयान २५६ किमी x १२१९७३ किमी अंतरावर आहे. भारतीय अंतराळ एजन्सीने म्हटले आहे की, पुढील मॅन्युअर ट्रान्स-लॅग्रेजियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) १९ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता केली जाईल.
Aditya-L1 Mission:
The fourth Earth-bound maneuvre (EBN#4) is performed successfully.ISRO’s ground stations at Mauritius, Bengaluru, SDSC-SHAR and Port Blair tracked the satellite during this operation, while a transportable terminal currently stationed in the Fiji islands for… pic.twitter.com/cPfsF5GIk5
— ISRO (@isro) September 14, 2023
‘या’ पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास
हे आदित्य (Aditya L1) यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
या सौरमोहिमेद्वारे (Aditya L1) सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community