LIC Dividend : एलआयसीने सरकारला दिला १,८३१ कोटी रुपयांचा लाभांश 

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने सरकारला २०२२-२३ वर्षासाठी १,८३१ कोटी रुपयांचा लाभांशाचा धनादेश देऊ केला आहे. कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहांती यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना हा धनादेश सुपूर्द केला.

169
LIC Dividend : एलआयसीने सरकारला दिला १,८३१ कोटी रुपयांचा लाभांश 
LIC Dividend : एलआयसीने सरकारला दिला १,८३१ कोटी रुपयांचा लाभांश 

ऋजुता लुकतुके

आयुर्विमा महामंडळ अर्थात, एलआयसी कंपनीने १४ सप्टेंबर रोजी केंद्रसरकारला १,८३१ कोटी रुपयांचा धनादेश लाभांशापोटी केंद्रसरकारला देऊ केला. कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहांती यांनी वित्त सेवांचे अतिरिक्त सचिव एम पी तंगिराला यांच्या उपस्थितीत हा धनादेश अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सोपवला.

एलआयसी (LIC Dividend) कंपनीने २८ ऑगस्टला घेतलेल्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा लाभांश मंजूर केला होता. कंपनीचं हे ६७वं वर्ष आहे. १९५६ साली ५ कोटी रुपयांच्या भांडवलावर सुरू करण्यात आलेल्या या कंपनीचं मूल्य मार्च २०२३ पर्यंत ४५.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तसंच कंपनीकडे ४०.८१ लाख कोटी रुपयांचा आयुर्विमा आहे.

दोन दशकांपूर्वी देशातील विमा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं. पण, तरीही आयुर्विमा क्षेत्रात एलआयसी (LIC Dividend) ही सरकारी कंपनी अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर आहे. २०२० साली एलआयसी कंपनीची नोंदणी शेअर बाजारातही झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.