Ajit Pawar : विरोधक कारण नसताना ट्रोल करतात, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

176
Ajit Pawar : विरोधक कारण नसनाता ट्रोल करतात, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
Ajit Pawar : विरोधक कारण नसनाता ट्रोल करतात, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

सध्या राज्यात वेगवेगळ्या विभागांत मुला-मुलींची भरती चालू आहे, पण विरोधक चुकीच्या बातम्या पसरवतात. त्यामुळे त्यांना उकळ्या फुटतात शिवाय काहीही कारण नसताना मला ट्रोल केले जाते, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी सकाळी कंत्राटी भरतीसंदर्भात अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते.

यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला-मुलींची भरती चालू आहे. यासंदर्भातला आढावा मी घेतला आहे. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे. त्यामुळे स्टाफ भरतीची प्रक्रिया चालू आहे. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, त्याठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

(हेही वाचा – FIFA Awards 2023 : फिफा वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मेस्सी, एमबापे आणि हालाड यांना मानांकनं)

सर्वात मोठी भरती करणार

राज्यातील विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्य सरकार लवकरच वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही राज्यातील आतापर्यंत सगळ्यात मोठी भरती असेल, असा दावाही त्यांनी केला. आत्तापर्यंत एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.