IND vs BAN : बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज

172
IND vs BAN : बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज

भारतीय संघाने श्रीलंकेला हरवून आशिया चषक २०२३च्या (IND vs BAN) अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मंगळवारी (१२ सप्टेंबर) रोजी श्रीलंकेला हरवून टीम इंडियानं फायनलचं तिकीट मिळवलं. अशातच आज म्हणजेच शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी भारतीय संघ बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियातील (IND vs BAN) सिनियर स्टार प्लेयर्सना विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी आतापर्यंत एक्स्ट्रामध्ये बसलेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतात. भारतीय संघाचे बॉलिंग कोच यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतचे संकेत दिले. त्यामुळे आजच्या सामन्यात मोठे बदल दिसू शकतात.

(हेही वाचा – Kashmir Ganeshotsav : काश्मिरात प्रथमच घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया…’ जयघोष, पुण्यातील मंडळांनी घेतला पुढाकार)

‘या’ बदलांची शक्यता?

बांग्लादेश विरोधातील सामन्यात केएल राहुलला (IND vs BAN) विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. केएल राहुलऐवजी सुर्यकुमार यादव खेळताना दिसू शकतो. दुखापतीतून सावरल्यानंतर राहुलनं सलग दोन सामन्यांमध्ये बॅटिंग आणि विकेटकिपिंगची धुरा सांभाळली होती. त्यामुळे फायनसाठी त्याला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशन विकेटकिपीर असेल. याव्यतिरिक्त स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्यालाही आजच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. पांड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

बॉलिंग ऑर्डरमध्येही बदल होण्याची शक्यता

स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (IND vs BAN) आणि मोहम्मद सिराजला आराम देऊन बुमराहच्या जागी मोहम्मद शामी आणि सिराजच्या जागी शार्दुल ठाकूर पूर्ण करू शकतो.

असा असेल आजचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, प्रसिद्ध कृष्णा

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.