Kashmir Ganeshotsav : काश्मिरात प्रथमच घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया…’ जयघोष, पुण्यातील मंडळांनी घेतला पुढाकार

श्रीनगरमध्ये श्रींच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा

163
Kashmir Ganeshotsav : काश्मिरात प्रथमच घुमणार 'गणपती बाप्पा मोरया...' जयघोष, पुण्यातील मंडळांनी घेतला पुढाकार
Kashmir Ganeshotsav : काश्मिरात प्रथमच घुमणार 'गणपती बाप्पा मोरया...' जयघोष, पुण्यातील मंडळांनी घेतला पुढाकार

सध्या सर्वत्र आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी जय्यत सुरू आहे. गणेशोत्सव सुरू व्हायला आता अवघे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांची मंगलमूर्तीच्या स्वागताची तयारी वेगात सुरू असतानाच यंदा प्रथमच काश्मिरमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया…’ चा जयघोष निनादणार आहे.

पुण्यातील सार्वजनिक मंडळांनी काश्मिरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अजूनपर्यंत जम्मू-काश्मिरमध्ये कधी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला नव्हता. आता यंदा प्रथमच दीड दिवसांचा गणपती श्रीनगरमध्ये बसणार आहे. लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर हा गणेशोत्सव होणार आहे. श्रीनगरमध्ये श्रींच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करून दीड दिवसांनंतर त्याचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी पुण्यातील सात गणपती मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

कसबा गणपतीची प्रतिकृती तयार

पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती, केसरी वाडा, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ या ७ मंडळांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. श्रीनगर येथील गणपती उत्सवासाठी पुण्यातील कसबा गणपतीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्या सुपूर्द करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.