मुंबई प्रतिनिधी
देशातील प्रमुख १४ अँकरच्या कार्यक्रमांना आपला प्रतिनिधी न पाठविण्याचा निर्णय “इंडिया” (I.N.D.I.A) च्या समन्वय समितीने घेतला आहे.. माध्यमांवर बहिष्कार टाकण्याचा इंडियाचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याने आम्ही इंडियाच्या या निर्णयाचा निषेध करतो.
आम्हाला कल्पना आहे की, ज्या अँकरच्या शो वर इंडियानं (I.N.D.I.A) बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे ते कथित गोदी मिडियाचे घटक आहेत. मात्र देशातला एकजात सारा मिडिया गोदी मिडिया नाही. काही माध्यमं विरोधकांची बाजू देखील तेवढीच प्रभावीपणे मांडतात आणि काही तटस्थ देखील आहेत.
(हेही वाचा-Lift Accident : पुन्हा एकदा लिफ्ट कोसळून चार कामगारांचा जागीच मृत्यू)
मात्र इंडियानं (I.N.D.I.A) सुरू केलेला ट्रेण्ड पुढे सुरू राहिला तर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आपल्याला नको असलेल्या अँकरच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतील. हे माध्यम स्वातंत्र्यासाठी जेवढं घातक आहे तेवढंच ते लोकशाहीसाठी देखील मारक आहे.अस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
असं बहिष्काराचं हत्यार उपसण्याऐवजी इंडियानं (I.N.D.I.A) नको असणाऱ्या अँकरच्या कार्यक्रमांस जाऊन तेथे आपली बाजू खंबीरपणे मांडायला हवी. शिवाय चर्चेला विरोधक जाणारच नसतील तर दुसरी बाजू जाणून घेण्याचा सामान्य प्रेक्षकाच्या अधिकारांवर देखील गदा आल्यासारखं होईल. त्यामुळे इंडियानं आपला निर्णय मागं घ्यावा असं आवाहन मराठी पत्रकार परिषद करीत आहे.
Join Our WhatsApp Community