मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्याची अशी स्थिती झाल्याने मनसेकडून या मुद्द्यावर शुक्रवार (१५ सप्टेंबर) आंदोलन (MNS Movement )करत आक्रमक भूमिका घेण्यात आली. अभियंता दिनानिमित्त विशेष कार्यक्रामाचे आयोजन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा सरकारकडून सत्कार करण्यात आला. मात्र या कार्यक्रमात मनसेने जोरदार आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी मनसेकडून काही दिवसांपासून केली जात आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहाबेर मनसेने आंदोलन केलं.
(हेही वाचा : Chandrayaan 1 ने चंद्रावर शोधले पाणी; अनेक वर्षांपासूनचा झाला खुलासा)
जर कामंच झालेलं नाही तर तुम्ही यांचे सत्कार कसले करता? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई गोवा महामार्गावरच्या एकाच लेनचे काम झाले आहे मात्र त्यावरही खड्डे पडले आहेत असा आक्षेप मनसे कार्यकर्त्यांनी केले.दरम्यान या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधतही घोषणाबाजी केली. तसेच त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. पोलिसांनी संदीप देशपांडे यांना तसेच अन्य सर्व कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community