गणेशोत्सव काळात (Ganeshotsav 2023) प्रभादेवी परिसरात शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे या तीनही पक्षांना स्वागत मंडप उभारण्याची परवानगी नाकारली आहे. गेल्या वर्षी परिसरात याच कारणावरून राडा आणि गोळीबार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
काय आहे पार्श्वभूमी?
प्रभादेवी परिसरात मनसेने साधारणतः १२ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2023) सुरुवात केली. नंतर काही वर्षांनी सदा सरवणकर आमदार झाल्यानंतर त्यांनी देखील य मंडपासमोर गणेशोत्सवाला सुरुवात केली. गेल्या वर्षी शिवसेना पक्षातून बंड करून एकनाथ शिंदे आणि ४० आमदार बाहेर पडले. सदा सरवणकर हेही शिंदेंच्या बंडात सहभागी होते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तिसरा मंडप उभारला. बंडामुळे आधीच वातावरण तापलेले असताना गणेश विसर्जनाच्या दिवशी दोन्ही गट आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही गटात वाद झाला, गोळीबार झाला, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये सदा सरवणकरांना कालांतराने क्लीन चीट देण्यात आली. दरम्यान आता तिन्ही पक्षांकडून सध्या पर्यायी जागेचा शोध सुरू आहे.
(हेही वाचा – Asia Cup IND VS BAN : बांगलादेशच्या दोन सलामीवीर क्रिकेटपटूंना भारतीय गोलंदाजांनी केले बाद)
यंदा पुन्हा तिन्ही पक्षांनी गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) काळात मंडप उभारण्याचे परवानगी मागणारे पत्र पोलिसांकडे सादर केले होते. मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत तिन्ही पक्षांना मंडप उभारण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना तिथे गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. तिन्ही पक्षांकडून सध्या पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. तिन्ही पक्षांना प्रभादेवी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र तिन्ही पक्ष त्याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.
गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश भक्तांचे स्वागत (Ganeshotsav 2023) करण्यासाठी स्वागत मंडप उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. त्या दरम्यान, दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्री राड्यात झाले. शिंदे गटात असलेले आमदार समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावेळी सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याचे तपासात समोर आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community