महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी या अगोदर सरकारने केलेल्या पॅकेजेस आणि घोषणांची आठवण करून देण्यासाठी “घे पॅकेज” आंदोलन करण्यात आले. 2012 ते 2023 या कालावधीत चारही राजकीय पक्षाच्या मंत्र्यांनी छत्रपती संभाजी नगरसाठी वेगवेगळ्या पॅकेजच्या घोषणा केल्या आहेत. यात रोज पाणी देतो, केंब्रिज चौक ते नगर नाका अखंड उड्डाणपूल, नवीन बसस्थानक, स्मार्ट सिटी, सहा पदरी जालना रोड, मेट्रो, बुलेट ट्रेन, भूमिगत गटार योजना अशा घोषणांचा समावेश आहे. या सर्व घोषणांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आठवण करून दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, बिपीन नाईक, जिल्हा सचिव अनिकेत निल्लावारआदी पदाधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा Supreme Court : मद्रास उच्च न्यायालयाचे वकील सनातन धर्मावरील वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात)
Join Our WhatsApp Community