BJP : मिशन २०२४ : ‘गिव्ह अप युअर टिकट’

भाजपचा अनोखा प्रयोग : नवीन चेहऱ्यांना संधी

150
BJP : मिशन २०२४ : 'गिव्ह अप युअर टिकट’
BJP : मिशन २०२४ : 'गिव्ह अप युअर टिकट’

भाजपमध्ये तिकिटासाठी गळेकापू स्पर्धा नाही. आमच्याकडे ज्येष्ठ नेते स्वत:हून नव्या लोकांना संधी देण्यास उत्सुक असतात, असा संदेश देशाला देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अनोखा प्रयोग पाच राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘गिव्ह अप युअर टिकट’, या योजनेनुसार नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. यासाठी पक्षातील नेत्यांनी स्वमर्जीने पुढे यावे, असे आव्हान पक्षातर्फे करण्यात आले आहे.

पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ‌विद्यमान आमदारांनी स्वेच्छेने उमेदवारीवरील आपला दावा मागे घ्यावा म्हणून भाजप चाचपणी करीत आहे. उमेदवार निश्चित करण्यापूर्वी या पर्यायावर फीडबॅक घेण्याच्या विचारात केंद्रीय निवड समिती आहे. ‘गिव्ह अप युअर टिकट’ (उमेदवारीवरील दावा सोडा) या योजनेतंर्गत विद्यमान आमदारांसह संभाव्य उमेदवारांशीही सल्लामसलत सुरू आहे.

(हेही वाचा – ED Raid : टायगर श्रॉफ, सनी लिओनी आणि नेहा कक्करसह १४ कलाकार ईडीच्या रडारवर)

मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर सुरू केलेल्या ‘गिव्ह अप युअर टिकट’ योजनेचा फीडबॅक काय येतो ते पाहून यादीत बदल केला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. मध्य प्रदेशात तीन उमेदवार बदलले जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. तीन विद्यमान आमदारांनी उमेदवारीचा दावा सोडावा याबद्दल पक्षातील फीडबॅक काय आला यावर चर्चा झाली.

नेहमी नव्या लोकांवर जबाबदारी सोपवण्याकडे भाजप कार्यकर्त्यांचा कल असतो. नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची तयारी अनेक विद्यमान आमदारांनी स्वेच्छेने दर्शवली आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. तथापि, आमदारांना पुन्हा उमेदवारीच दिली जाणार नाही असे नसून विद्यमान आमदाराची निवडणूक जिंकण्याची क्षमता असल्यास पक्ष त्याला तिकीट देणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.