Building Collapse : डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली ,५० ते ५५ लोक अडकली असून त्यांची प्रकृती गंभीर

उपचारासाठी त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्नालयात रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.अजून काही लोक अडकले असून त्याचा शोध सुरू आहे.

209
Building Collapse : डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली ,५० ते ५५ लोक अडकली असून त्यांची प्रकृती गंभीर
Building Collapse : डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली ,५० ते ५५ लोक अडकली असून त्यांची प्रकृती गंभीर

राज्यातील धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीमध्ये एका सोसायटीची इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी (१५ सप्टेंबर) घडली (Building Collapse) आहे. या इमारतीत ४० खोल्या असल्याची माहिती आहे. या इमारतीमध्ये दोन जण अडकल्याची माहिती आहे. पूर्वेतील आयरे – दत्तनगर परिसरातील आदिनारायन सोसायटी कोसळल्याची घटना घडली.  मात्र यामध्ये ५० ते ५५ लोक अडकली असून त्यांची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.अजून काही लोक अडकले असून त्याचा शोध सुरू आहे.

आयरे गावातील लक्ष्मण रेषा इमारती जवळील आदिनारायण भुवन ही चार माळ्याची इमारत कोसळली. ही इमारत अनधिकृत आणि धोकादायक असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या इमारतीचे दोन मजले कोसळले आहेत. ही इमारत लोड बेरिंग पद्धतीने बांधण्यात आली आहे. पालिकेने ही इमारत यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली आहे.

(हेही वाचा :Shikhar Savarkar Purskar : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कारांचे वितरण)

पलिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे, ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी तातडीने इमारत दुर्घटना ठिकाणी भेट दिली. गुरुवारी या इमारतीला तडे गेलेले होते. महानगरपालिकेने इमारत धोकादायक ठरवून रहिवाशांना नोटिसाही दिलेल्या होत्या. त्यामुळे इमारत रिकामी करण्यात आलेली होती.सकाळी पालिका अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी येऊन नागरिकांना बाहेर काढत होते. सायंकाळी नागरिक आपले सामान घरातून बाहेर काढत असतानाच अचानक इमारतीचा वरील भाग कोसळू लागल्याने सर्वजण बाहेर पळाले. यात अरविंद हे मात्र इमारतीत अडकले आहेत. ते आजारी असल्याने बेडवर होते. त्यांचा मुलगा सिद्धेश व आई हे बाहेर पडले पण अरविंद आतच अडकले. तर गीता यांना आधीपासून पालिका कर्मचारी बाहेर या असे सांगत होते मात्र त्यांनी दरवाजा बंद करून घेत घरात स्वतःला कोंडल्याने त्या आत अडकल्याची माहिती प्रभाग अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन दलाच्या 2 गाड्या, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.