स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गिर्यारोहण क्षेत्रासाठीच्या शिखर सावरकर पुरस्कार २०२३ चे वितरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी राजभवन येथे करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गिर्यारोहणात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणा-या हरिश कपाडिया यांना यावेळी मानाचा शिखर सावरकर जीवन गौरव साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, गिर्यारोहणाच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन आणि सामाजिक कार्यास मोठ्या प्रमाणात हातभार लावणा-या मुंबईच्या दुर्गवीर या संस्थेला उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार देण्यात आला. गिर्यारोहणात विशेषतः सह्याद्री विभागात विशेष प्राविण्य दाखविणा-या उदयोन्मुख युवा गिर्यारोहक पुरस्कार मुंबईच्या मोहन हुले यांना देण्यात आला.
(हेही वाचा Shikhar Savarkar Purskar : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कारांचे वितरण)
Join Our WhatsApp Community