Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्तपद म्हणून दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत परतणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी पहिल्या सनदी अधिकारी

यापूर्वी सह आयुक्त म्हणून सेवा बजावणारे सनदी अधिकारी हे महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून पुन्हा महापालिकेत परतले होते.

1176
Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्तपद म्हणून दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत परतणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी पहिल्या सनदी अधिकारी
Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्तपद म्हणून दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत परतणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी पहिल्या सनदी अधिकारी

राज्‍याच्‍या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागाच्‍या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांची राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केल्यानंतर डॉ. जोशी यांनी शुक्रवारी १५ सप्‍टेंबर २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्त (शहर) पदाचा पदभार स्वीकारला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी डॉ. जोशी यांचे पुष्‍पगुच्‍छ प्रदान करुन स्वागत केले. महापालिकेच्या इतिहासात अतिरिक्त आयुक्तपदी दुसऱ्यांदा नियुक्ती झालेल्या डॉ. अश्विनी जोशी या पहिल्या सनदी अधिकारी ठरल्या आहेत. यापूर्वी सह आयुक्त म्हणून सेवा बजावणारे सनदी अधिकारी हे महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून पुन्हा महापालिकेत परतले होते.

(हेही वाचा – Nipah virus : केरळमध्ये निपाहचे ६ रुग्ण, दोघांचा मृत्यू)

डॉ. जोशी या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००६ बॅचच्या अधिकारी आहेत. त्‍यांनी मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय येथून बी. डी. एस. ही पदवी संपादन केली. नागपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, अकोला येथे आदिवासी विकास प्रकल्‍पाच्‍या प्रकल्प अधिकारी, भंडारा जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई उपनगर जिल्ह्याच्‍या अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त, अकोला व सिंधुदुर्ग जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी, शिधावाटप नियंत्रक आणि संचालक-नागरी पुरवठा, (मुंबई) तसेच ठाणे व मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्‍या आयुक्‍त, विकास आयुक्‍त (असंघटीत कामगार) इत्‍यादी विविध पदांवर कामकाज केले आहे. एकूण १७ वर्षांच्या आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत डॉ. जोशी यांनी महाराष्ट्र शासनामध्ये विविध महत्वपूर्ण पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना विशेष ठसा उमटवला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.