पुण्यातील दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता यंदा प्रथमच पुणेकरांना आपल्या लाडक्या गणरायाला ‘मेट्रो’तून घरी नेता येणार आहे. प्रथमच पुणे मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मेट्रो प्रशासनाने भाविकांसाठी नियमावली जाहिर केली आहे. यामध्ये भाविकांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत स्पष्ट सूचना केल्या आहेत. भाविकांना उत्सवाचा आनंद लुटताना मेट्रोची आणि स्वत:ची काळजी घ्यावी, अशी भावना मेट्रोने व्यक्त केली असून भाविकांना काही मदत हवी असल्यास त्यांनी 18002705501 या क्रमांकावर साधावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.
‘ही’ आहे नियमावली…
– मेट्रो मधून गणपतीची मूर्ती घेऊन जायची असेल तर ती केवळ 2 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीची असावी.
– मूर्तीला सुरक्षित व व्यवस्थित झाकून न्या.
– कमी गर्दीच्या वेळेस मूर्ती नेण्यास प्राधान्य द्या.
– स्थानकावर लिफ्टचा वापर करा.
– मेट्रो ट्रेन आणि फलाट यांच्यामधील अंतर लक्ष्यात घ्या.
– पिवळ्या रेषेच्या मागे उभे रहा.
– ढोल ताशे, भोंगे वाजविण्यासाठी असलेल्या निर्बधांचे पालन करा, शांतता राखा.
– आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
– मेट्रो ट्रेन, स्थानक परिसर स्वच्छ ठेवा.
– एकमेकांची काळजी घेत जाण्या येण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करू नका.