Sourav Ganguly : सौरव गांगुली आता होणार उद्योजक

पश्चिम बंगालमध्ये स्थापन करणार पोलाद प्रकल्प

169
Sourav Ganguly : सौरव गांगुली आता होणार उद्योजक

ऋजुता लुकतुके

‘सगळ्यांना माहीत आहे की मी (Sourav Ganguly) एक क्रिकेटपटू आहे. पण, एका छोट्या पोलाद प्रकल्पाला मी २००७ मध्येच सुरुवात केली होती,’ असं माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला तेव्हा उपस्थितांना थोडासा धक्काच बसला. सौरव गांगुली सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर स्पेन आणि दुबईच्या दौऱ्यावर आहे. तिथे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या बरोबर असलेलं पथक राज्यात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या मनसुब्यानेच गेलं आहे.

अशाच एका परिसंवादात म्हणजे स्पेनची राजधानी माद्रिदमधील बंगाल जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत बोलताना (Sourav Ganguly) सौरभने आपल्या उद्योजकतेविषयी सहजपणे सांगितलं. तो म्हणाला, ‘मला या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानायचे आहेत. कारण, त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही पश्चिम बंगाल राज्यातील तिसरा मोठा पोलाद उत्पादन प्रकल्प उभा करू शकलो आहोत. अनेकांना मी फक्त क्रिकेटपटू म्हणूनच ठाऊक आहे. पण, एका छोट्या पोलाद प्रकल्पाची सुरुवात मी २००७ मध्येच केली होती.’

(हेही वाचा – Boycott of journalists : वृत्तवाहिन्यांच्या  पत्रकारांवरील बहिष्कार ही ‘घमंडिया’ आघाडीची हुकूमशाही – भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका)

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) या वक्तव्याने सुरुवातीला सगळ्यांना धक्काच बसला. कारण, क्रिकेट पासून ते जड उद्योगातील एक उद्योजक अशी मजल गांगुलीने मारली आहे. भारतातही आता ही बातमी सगळीकडे पसरली आहे. पश्चिम मेदिनीपूर इथं सालबोनी भागात गांगुली कुटुंबीय आपला नवीन पोलाद प्रकल्प उभारणार आहेत. सहा महिन्यात प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात होईल, आणि आणखी पाच महिन्यात तो तयारही होईल, असा त्यांचा होरा आहे.

सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा एका पिढीजात उद्योजक कुटुंबातून आला आहे. त्याच्या आजोबांनी ५०-५५ वर्षांपूर्वी बंगालमध्ये छापखाना व्यवसाय सुरू केला होता. तिथून पुढे सौरवचे वडील चंदिदास गांगुली यांनी हा उद्योग वाढवला. ते पश्चिम बंगालमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे उद्योजक ठरले होते. त्यांनीच आपली मुलं स्नेहाशिष आणि सौरव यांच्या मदतीने पोलाद उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे गांगुली (Sourav Ganguly) कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंध आहेत. आताही ममता दीदींबरोबर सौरव बंगालमधील उद्योजकतेसाठी पोषक वातावरण या विषयीची माहिती परकीय गुंतवणूकदारांना देण्यासाठी त्यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर गेला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सौरव गांगुलीने उद्योग क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. अलीकडेच त्याने कोलकात्यातील एका फूड डिलिव्हरी कंपनीत गुंतवणूक केली होती. तर क्रिकेटमध्येती तो सक्रिय असून रॉजर बिन्नी यांच्या पूर्वी तोच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.