Congress Vs Samajwadi Party : सपाने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला

इंडिया आघाडीतील पक्षाचा वाद चव्हाट्यावर

182
Congress Vs Samajwadi Party : सपाने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला
Congress Vs Samajwadi Party : सपाने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला
  • वंदना बर्वे

उत्तरपदेशच्या घोसी पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा विजय झाल्यामुळे काँग्रेस पक्ष ईर्षेने जळून खाक झाला आहे. यामुळे, लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडियातील आघाडी पक्षांमध्ये फूट पडते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सविस्तर वृत्त असे की, अलिकडेच सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा तीन तर इंडिया आघाडीला चार जागांवर विजय झाला होता. यात सर्वात महत्वाची पोटनिवडणूक झाली ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या यूपीतील घोसी मतदारसंघात. येथे सपाच्या उमेदवाराने भाजपच्या विद्यमान आमदाराचा पराभव करून विजय मिळविला होता. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या या विजयामुळे काँग्रेसच्या तळपायातील आग मस्तकात गेली आहे. कारण, ज्या सात जागांवर निवडणूक झाली त्यात उत्तराखंडमधील बागेश्वर मतदारसंघाचाही समावेश आहे. काँग्रेसने पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बागेश्वरमध्ये पूर्ण जोर लावला होता. परंतु, भाजपच्या पार्वती दास यांनी काँग्रेसचे बसंत कुमार यांचा २४०५ मतांनी पराभव केला.

काँग्रेसचे पित्त खवळण्यामागचे खरे कारण असे की, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने सुध्दा बागेश्वरमध्ये उमेदवार उतरविला होता. सपाचे उमेदवार भगवती प्रसाद यांना केवळ ६३७ मते मिळाली होती. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यात सपाच्या उमेदवाराने सिंहाचा वाटा उचलला. अर्थात, काँग्रेसला हरविण्यासाठी सपाने बागेश्वरमध्ये जाणीवपूर्वक उमेदवार उतरविला, असे काँग्रेसला म्हणायचे आहे. काँग्रेस एवढ्यावरच थांबली नाही तर, घोसी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सपाचा उमेदवार जिंकावा यासाठी काँग्रेसने उमेदवार उतरविला नाही. असेच औदार्य सपाने उत्तराखंडमध्ये दाखविले असते तर काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असता. परंतु, सपाने काँग्रेसला हरविण्यासाठी बागेश्वरमध्ये उमेदवार उतरविला, असा आरोप प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केला आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस खास पध्दतीने होणार साजरा)

याच मुद्यावरून काँग्रेस आणि सपामध्ये शाब्दिक युध्द छेडले आहे. सपाचे मुख्य प्रवक्ते आणि उत्तराखंडचे प्रभारी राजेंद्र चौधरी म्हणाले की, पूर्वी काँग्रेसने उत्तराखंडमध्ये सपाला महत्त्व दिले नाही आणि आता नाहक आरोप लावत आहे. मुळात, आपल्याला सपाच्या मदतीची गरज नाही असे काँग्रेसला वाटत होते. म्हणून त्यांनी सहकार्य करण्यासाठी सपाकडे हात वाटविला नाही. आणि आता निवडणूक हरल्याने ते आमच्यावर टीका करत आहेत. दुसरीकडे, यूपीचे काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी मऊ येथील एका कार्यक्रमात घोसी पोटनिवडणुकीत सपाच्या विजयात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे म्हटले. एवढेच नव्हे तर, बागेश्वरच्या पराभवासाठी त्यांनी सपाला जबाबदार धरले. अखिलेश यादव यांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक आहे, असेही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.