International Ganesh Festival : गणेशोत्सवाच्या कालावधीत राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन 

174
International Ganesh Festival : गणेशोत्सवाच्या कालावधीत राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन 
International Ganesh Festival : गणेशोत्सवाच्या कालावधीत राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन 

18  ते 28 सप्टेंबर या काळामध्ये राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय पर्यटन विभागाकडून घेण्यात आला आहे. (International Ganesh Festival) यंदाच्या वर्षी ‘आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटनाला चालना देत पारंपरिक कला आणि संस्कृतीची ओळख विदेशातील पर्यटकांना करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 28 सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव हा केवळ भव्यतेसाठी आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा सण नाही. यामुळे आपल्या महाराष्ट्राची कला आणि सांस्कृतिक वारसा, तसेच लोकांच्या एकात्मतेचे दर्शन घडवण्याचे एक उत्तम माध्यम तयार होते. आम्ही आपली पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा सादर करण्याचा आणि तो जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Police Officer Rape Case : गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल)

गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा, तसेच एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे एक उत्तम माध्यम आहे. तोच पारंपरिक कला आणि सांस्कृतिक ठेवा या महोत्सवाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या महोत्सवादरम्यान राज्यातील विविध भागातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार आणि समाजमाध्यम प्रभावक, तसेच वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित केले जाणार आहे. (International Ganesh Festival)

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच गेटवे ऑफ इंडिया इथे श्री गणेशाच्या विविध रूपांच्या विशेष सांस्कृतिक केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे. वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात येईल. तर या भागामध्ये देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. या वेळी महाराष्ट्राची पारंपरिक आदिवासी ‘वारली’ संस्कृतीचे दर्शन घडणवारी कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तूंचे कलादालन देखील करण्यात येणार आहे. (International Ganesh Festival)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.