Sanjay Raut : संसदेच्या विशेष अधिवेशनात संजय राऊतांवर कारवाई होणार?

विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई करावी, अशी शिफारस महाराष्ट्र विधिमंडळाच्या हक्कभंग समितीने राज्यसभेच्या सभापतींकडे केली आहे.

147
Sanjay Raut : संसदेच्या विशेष अधिवेशनात संजय राऊतांवर कारवाई होणार?
Sanjay Raut : संसदेच्या विशेष अधिवेशनात संजय राऊतांवर कारवाई होणार?

दररोज सकाळी उठून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर संसदेच्या विशेष अधिवेशनात कारवाईचे संकेत मिळत आहेत. विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई करावी, अशी शिफारस महाराष्ट्र विधिमंडळाच्या हक्कभंग समितीने राज्यसभेच्या सभापतींकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, विशेष अधिवेशनात राऊतांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

राज्यसभा खासदार संजय राऊतांनी १ मार्च २०२३ कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना, ‘राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे’, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. याविरोधात शिवसेना-भाजपाने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हक्कभंग सूचना दाखल केली. विधानसभेत आमदार अतुल भातखळकर आणि विधानपरिषदेत आमदार राम शिंदे यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि सभापतींना यासंदर्भातील पत्र दिले. राऊतांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करण्यात आली.

(हेही वाचा – PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्मान भारत योजनेला चालना)

त्यानंतर दोन्ही सभागृहांच्या हक्कभंग समितीने राऊत यांच्यावर कारवाईची शिफारस करीत, राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहिले. या पत्राची दखल घेऊन राऊतांवर कारवाई केली जाणार असल्याचे कळते. संसदेच्या विशेष अधिवेशनात त्यासंबंधिचा प्रस्ताव पटलावर ठेवला जाईल आणि निलंबनाची कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. हे निलंबन किती दिवसांसाठी असेल, याबाबत अद्याप माहिती कळू शकलेली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.