Indian Army Killed Terrorists : जम्मू काश्मीरमध्ये ‘या’ जिल्ह्यांत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश

186
Indian Army Killed Terrorists : जम्मू काश्मीरमध्ये 'या' जिल्ह्यांत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश
Indian Army Killed Terrorists : जम्मू काश्मीरमध्ये 'या' जिल्ह्यांत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. (Indian Army Killed Terrorists) त्या अंतर्गत विविध ठिकाणी कारवाई चालू आहे. जम्मू काश्मीरच्या काही जिल्ह्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे, तर काही जिह्यात लक्ष ठेवण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी जंगलात लपलेल्या एका दहशतवाद्याला ठार केले आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवादी लपलेल्या ठिकाणी बॉम्बचा वर्षाव केला. ठार झालेला दहशतवादी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

(हेही वाचा – National OBC Federation : ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

उरी येथे २ दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती

भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या हेतून कारवाई करत असून, १६ सप्टेंबर या चौथ्या दिवशीही हे ऑपरेशन सुरु आहे. बारामुल्ला येथेही जवानांनी तीन दहशतवादी ठार केले आहेत. उरी येथेही चकमक झाली आहे. २ दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत. पण तिसरा दहशतवादी जिथे मारला गेला आहे, तो परिसर पाकिस्तानी पोस्टपासून जवळ आहे. तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. किश्तवाड येथील ज्या घरातील लोक दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले आहेत, त्या घरांवर पोलिसांनी नोटीस लावली आहे. (Indian Army Killed Terrorists)

कोकरनाग येथे लपलेल्या दहशतवाद्यांवर गोळीबार करण्यासह जवान ड्रोनच्या सहाय्याने त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. सुरक्षा जवानांनी फोर्स्टर परिसरात दहशतवादी लपले असलेल्या संशयित ठिकाणी बॉम्ब फेकले. चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल राजीव घई स्वत: या ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून हे ऑपरेशन केलं जात आहे. चकमकीच्या ठिकाणी सकाळपासून शांतता होती. पण काही वेळाने तिथे गोळीबार सुरु झाला होता. डोंगराच्या आसपासच्या परिसरात गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. येथे बऱ्याच वेळापासून पाऊस सुरु आहे, यामुळे ऑपरेशनमध्ये अडथळे येत आहेत. पण अद्यापही कोकरनाग येथे चकमक सुरु आहे. (Indian Army Killed Terrorists)

बारामुल्ला जिल्ह्यात तीन दहशतवादी ठार

बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लष्करासह झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं आहे की, बारामुल्ला जिल्ह्यातील उरी परिसरात लष्कर आणि पोलिसांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. येथेही सर्च ऑपरेशन सुरु आहे. अनंतनाग जिल्ह्यात चकमक सुरु असतानाच बारामुल्ला येथेही ही चकमक झाली. (Indian Army Killed Terrorists)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.