५ पेक्षा अधिक रुग्ण असलेली सोसायटी ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’!

सोसायटीने 'मायक्रो कंटेन्मेंट झोन' नियमाचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी १० हजार आणि त्यानंतर प्रत्येक वेळी २० हजार रुपये दंड आकाराला जाणार.  

163

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत, मुंबईतही परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता नवी नियमावली तयार केली आहे. ज्या सोसायटीमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडतील त्या सोसायटीला ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

काय आहे नवी नियमावली! 

  • कोणत्याही सोसायटीमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर संबंधित सोसायटी सील केली जाणार.
  • संबंधित सोसायटीच्या बाहेर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून  फलक लावण्यात येणार.
  • तसेच बाहेरील व्यक्तीला सोसायटीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
  • मायक्रो कंटेन्मेंट झोन बाबतच्या सर्व नियमांचे पालन करणे हे संबंधित सोसायटीची जबाबदारी असणार.
  • या नियमाचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी १० हजार आणि त्यानंतर प्रत्येक वेळी २० हजार रुपये दंड आकाराला जाणार.
  • संबंधित मायक्रो कंटेन्मेंट झोनकडे एक पोलीस तैनात राहणार.
  • वर्तमानपत्र, दूधवाला, खाद्य पदार्थ इत्यादी डिलिव्हरी बॉयला सोसायटीत प्रवेश दिला जाणार नाही.
  • संबंधित वस्तू गेटच्या बाहेर ठेवून त्या संबंधित फ्लॅटच्या मालकापर्यंत पोहचवण्याची यंत्रणा सोसायटीने तयार करावी.
  • केवळ वैद्यकीय तातडी आणि बोर्डाची परीक्षा या कारणांसाठीच सोसायटीतील नागरिकांना बाहेर जाण्याची परवानगी.
  • लक्षणे नसलेला मात्र होम क्वारंटाईन असलेला कोरोनाबाधित रुग्ण सोसायटीत फिरत असेल तर गुन्हा दाखल होईल.
  • महापालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मायक्रो कंटेन्मेंट झोनला भेट द्यावी.

(हेही वाचा : राज्याच्या मदतीला धावून आले केंद्रीय पथक! आता कोरोनाची शंभरी भरली?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.