Shrikant Shinde : अडीच वर्षात अडीच दिवस सरकारचा कारभार कसा हाकला, हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे – खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला

दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती टीका

275
Shrikant Shinde : अडीच वर्षात अडीच दिवस सरकारचा कारभार कसा हाकला, हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे - खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला
Shrikant Shinde : अडीच वर्षात अडीच दिवस सरकारचा कारभार कसा हाकला, हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे - खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला

जे मुख्यमंत्री सत्तेत असताना अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात गेलेत, अडीच वर्षात सरकारचा कारभार कसा हाकला, हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे, अशा बोचऱ्या शब्दात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आदित्य ठाकरेंवर ( Aaditya Thackeray) टीका केली. दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.सरकारकडून फक्त पोस्टरबाजी सुरू असल्याची जे टीका करतात त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये स्वतः जाऊन लोकांशी भेटा असेही श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले. आतापर्यंत लोकांना भेटला नाहीत आता तरी भेटा, तेव्हाच दोन सरकारमधील फरक तुम्हाला कळेल, असा टोलाही खा. शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना  लगावला.

कल्याणमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने कोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मोफत बसेस सोडण्यात आल्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. खा. श्रीकांत शिंदे म्हटले की, संभाजीनगर मध्ये कॅबिनेट झाली या कॅबिनेटमध्ये ६०,००० कोटींचे पॅकेज मराठवाड्याला दिलेलं आहे. अनेक प्रलंबित विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतले आहेत. मागील सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी सगळे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केले जात आहे.
(हेही वाचा : BMC : उत्सव काळात महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सजग राहावे)

मुंबई-गोवा महामार्गासाठी दोन्ही सरकारचे प्रयत्न
मुंबई गोवा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर बदलण्याचे काम केंद्र सरकारने केलं आणि त्या ठिकाणी एका मार्गिकाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपती आधी एक मार्गिका सुरू करण्यात येईल असे सांगितले. आपलं सरकार आल्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांच्या माध्यमातून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.