Kokan Ganeshotsav 2023 : रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं; नियोजनाच्या अभावामुळे गाड्या ६ तास उशीरानं

ढिसाळ कारभाराचा चाकरमान्यांना फटका

199
Kokan Ganeshotsav 2023 : रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं; नियोजनाच्या अभावामुळे गाड्या ६ तास उशीरानं

दरवर्षी गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात (Kokan Ganeshotsav 2023) जातात. त्याचप्रमाणे यावर्षीही चाकरमानी कोकणात जात आहेत. मंगळवार १९ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी असल्याने शनिवार आणि रविवारी कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र यावेळी प्रवाशांना रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.

कोकणवासीयांना रेल्वेस्थानकांवर (Kokan Ganeshotsav 2023) तब्बल ५ ते ६ तास ताटकळत थांबावं लागत आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या ६ तास उशिरानं धावत असल्यामुळे कोकणवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता १२ तासांच्या प्रवासासाठी कोकणाची वाट धरलेल्या चाकरमान्यांना तब्बल १८ तास लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Kokan Ganeshotsav 2023 : आता विमान प्रवासही सिझनल ! ऐन गणेशोत्सवात तिकिटाच्या दरात कैक पटीने वाढ)

कोकण रेल्वेच्या (Kokan Ganeshotsav 2023) डाऊन मार्गावर गाड्यांचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. त्यामुळे नियमित गाड्यांनाही फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम काही रेल्वे गाड्यांवरही झाला आहे. आज सकाळी सीएसएमटीहुन मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस सुटलीच नाही. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं (Kokan Ganeshotsav 2023) जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वेळेचा खोळंबा होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.