आयुष्यभराची पुंजी आपल्या हक्काचे घर विकत घेण्याकरिता सर्वसामान्य माणूस खर्ची घालत असतो. सध्या उद्योग, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमुळे पुणेकरांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे पुणेकरांचा भव्य आणि प्रशस्त घरे घेण्याकडे कल वाढला असल्याची माहिती नाईट फ्रॉन्कच्या एका अहवालाद्वारे समोर आली आहे.
पुणे शहरात घरांची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये 13,021 घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी या कालावधीपर्यंत 6,544 घरांची विक्री झाली होती. घरांची विक्री वाढत असताना स्टॅम्प ड्युटी कलेक्शन वाढले आहे. घरांच्या विक्रीतून मिळणारा महसूल तब्बल 82 टक्के वाढला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत 423 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. या काळात संपूर्ण राज्याचा स्टँम्प ड्युटीच्या माध्यमातून मिळालेला महसूल 3,226 कोटी रुपये आहे.
(हेही वाचा – LCA Mark 1A : वायूदल खरेदी करणार ‘एलसीए-मार्क 1-ए’ लढाऊ विमाने)
आता पुणेकरांची महागड्या घरांना पसंती…
पुण्यात 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची मागणी ग्राहकांकडून वाढली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या 130 घरांची नोंदणी झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये या किमतीची 65 घरे विकली गेली होती तसेच 25-50 लाख किंमत असलेल्या घरांची विक्री 34 टक्के वाढली आहे. 50 लाख ते 1 कोटी किंमत असलेल्या घरांची विक्री 32 टक्के वाढल्याचे नाईट फ्रॉन्कच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे पुणेकरांना आता महाग घरांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community