पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विश्वकर्मा जयंती’निमित्त ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ (PM Vishwakarma Yojana)सुरू केली आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जेव्हा बँक हमी देत नाहीत, तेव्हा मोदी तुमची हमी देतो. विना हमीपत्राशिवाय ३ लाख रूपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेचं व्याज कमी राहणार आहे. पहिल्यांदा १ लाखांचं कर्ज देण्यात येईल. हे कर्ज फेडल्यानंतर आणखी २ लाखांचं कर्ज दिलं जाईल. तसेच, आता सरकार विश्वकर्मा सहकाऱ्यांचं मार्केटिंगही करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७३ वर्षाचे झाले आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त मोदींनी देशाला मोठे गिफ्ट दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये करण्यात आली होती. तसेच पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील तटबंदीवरून लवकरच लॉन्च करण्याचे आश्वासन दिले होते.
विश्वकर्मा योजनेंतर्गत सरकार १३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे, ज्याद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत मिळेल. योजनेच्या माध्यमातून सोनार, लोहार, नाई आणि मोची यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळणार आहेत. ही योजना कलाकार आणि कारागिरांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास येईल,’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सोनार, लोहार, कुंभार, चांभार, नाभिक यांसारख्या पारंपारिक कौशल्ये असलेल्यांना लाभ मिळणार आहे. योजनेअंतर्गत पारंपारिक कौशल्याची कामे करणाऱ्यांना पहिल्या टप्प्यात १ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचं कर्ज दिलं जाईल.
( हेही वाचा :Lower Paral flyover : लोअर परळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू होणार)
विश्वकर्मा योजनेत १८ व्यवसायांचा समावेश
केंद्र सरकारने विश्वकर्मा योजनेत १८ पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यवसायांचा समावेश केला आहे. या योजनेमुळे भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कलाकार आणि कारागिरांना मदत होणार आहे. योजनेत रंगरंगोटी करणारे, नाभिक, होडी बनवणारे, लोहार, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभार, मुर्तिकार, माशांचं जाळ बनवणारे, खेळणे तयार करणाऱ्यांसह अन्य काहींचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community