Footpaths Became Hawker Paths : बोरिवली पश्चिम येथे फूटपाथ बनले फेरीवाले पाथ; पादचाऱ्यांना चालणेही अशक्य; वाहतूक कोंडीने मनस्ताप 

161
Footpaths Became Hawker Paths : बोरिवली पश्चिम येथे फूटपाथ बनले फेरीवाले पाथ; पादचाऱ्यांना चालणेही अशक्य; वाहतूक कोंडीने मनस्ताप 
Footpaths Became Hawker Paths : बोरिवली पश्चिम येथे फूटपाथ बनले फेरीवाले पाथ; पादचाऱ्यांना चालणेही अशक्य; वाहतूक कोंडीने मनस्ताप 

बोरिवली पश्चिम येथे फूटपाथवरील फेरीवाल्यांची समस्या गंभीर बनली आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर अनेक दिशांना अनेक फेरीवाल्यांनी ठाण मांडल्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. (Footpaths Became Hawker Paths) आता सणावाराच्या काळात तर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. फूटपाथ फेरीवाल्यांनी बळकावल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता तर असतेच; मात्र त्यासोबत वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडीची समस्याही वारंवार निर्माण होते.

(हेही वाचा –CM Eknath Shinde : योजना आम्ही पण घेऊन जायचो; पण इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टीकेला प्रत्युत्तर)

येथील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या बाजूला खाद्यपदार्थांच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर उभ्या असतात. त्याच्यासमोर कपडे विक्रेत्यांनी पादचाऱ्यांना फूटपाथवरून चालण्यास मज्जाव केला आहे. केवळ फूटपाथवरच नाही, तर येथील रस्त्यावरही फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. मोक्ष मॉलला लागून असलेल्या फूटपाथवर कपडे विक्रेत्यांची मोठी रंग लागली आहे, तर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून बाहेर आल्यावर भाज्या विकणाऱ्यांची गर्दी असते. फूटपाथ, रस्ता विभाजक यांवरही भाजी विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे गर्दी होऊन बस थांबाही शोधावा लागत आहे. बस रस्त्याच्या मधोमध थांबल्यामुळे वाहतूक कोंडी होते. पालिकेच्या भाजी मंडईच्या बाहेरील रस्त्यावर भाजी मंडईत नसतील, एवढे फेरीवाले असल्याने रस्त्याने चालणेही अशक्य झाले आहे. (Footpaths Became Hawker Paths)

पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या या फूटपाथवर फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण पालिका कधी हटवणार, असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित होत आहे. (Footpaths Became Hawker Paths)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.