दोन मोठ्या सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सोमवारी (१८ सप्टेंबर) पार पडणार आहे. शिवसेनेचा (Shiv Sena )पक्ष आणि चिन्हाबाबत १८ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. यासह ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केलीय.यावर कोर्टात सुनावणी होणार आहे . दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी दाखल झाली होती, पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. त्याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरही सुनावणी होईल. आमदारांच्या निलंबनासंदर्भात अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. या याचिकेवर सुनावणी होईल.
(हेही वाचा : Parliament Special Session 2023 : संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये ‘या’ विधायकांवर होणार चर्चा)
विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४०आमदारांनी गेल्या वर्षी बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील १६आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. १६आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांना लवकर घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community