संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला (Special Session) सोमवार पासून सुरुवात झाली . या अधिवेशनाचा दुसरा दिवस नव्या संसदेतून सुरु होणार आहे. यापार्श्वभूमीवर जुन्या संसद भवनाला निरोप देतानाचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. यावेळी त्यांनी या संसद भावनाच्या ऐतिहासिक क्षणांना उजाळा दिला.तसेच नव्या भवनात आता आपण जात आहोत पण जुनं संसद भवन पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिलं, असेही वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.
मोदी म्हणाले, जुन्या संसदेला स्मरण करताना आणि नव्या भवनात जाण्यापूर्वी इतिहासाच्या त्या प्रेरक महत्वपूर्ण क्षणांना स्मरण करुन आपण पुढे जात आहोत. या ऐतिहासिक भवनाला निरोप देत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे भवन इम्पिरिअल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलचं काम करत होतं, स्वातंत्र्यानंतर त्याला संसद भवनाचा दर्जा मिळला.ही इमारत उभारण्याचा निर्णय विदेशी खासदारांचा होता. पण आम्ही हे कधीही विसरु शकत नाही आणि गर्वानं सांगू शकतो की या संसद भवनात परिश्रम, घाम माझ्या देशवासियांनी गाळला होता. तसेच पैसे देखील माझ्या देशाच्या लोकांचे होते. या ७५ वर्षांच्या आपल्या यात्रेनं अनेक लोकशाही परंपरांची टिकवणूक केली.
(हेही वाचा : Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
आपण नव्या भवनात भलेही जाऊ पण जुनं संसद भवन देखील येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिल. हा भारताच्या लोकशाहीच्या स्वर्णिम प्रवासाचा भाग आहे. भारताच्या रक्तात लोकशाहीचं सामर्थ्य कसं आहे याची आठवण या भवनापासून होत राहिलं. अमृत काळातील पहिली पहाट, राष्ट्राला नवा आत्मविश्वास, नवा प्रण, नवं सामर्थ्यानं भरणार आहे. चारी बाजूंनी आज भारतीयांची चर्चा होत आहे.
कर्मचाऱ्यांचेही मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापतींपासून, सर्व खासदारांपासून ते संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे आभार मानले. “हे खरंय की आपण लोकप्रतिनिधी आपापल्या भूमिका पार पाडत असतो. पण सातत्यानं आपल्यामध्ये जी ही टोळी बसते.आपल्याला कागदपत्र पोहोचवण्यासाठी ते धावपळ करत असतात. सभागृहात काही चूक होऊ नये, यासाठी ते चौकस असतात. जे काम त्यांच्याकडून झालंय, त्यामुळेसुद्धा सभागृहातील कामकाज चांगलं व वेगाने होण्यासाठी मदत झालीये. मी त्या सर्व साथीदारांचं आणि त्यांच्या पूर्वजांचंही मनापासून अभिनंदन करतो”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community