पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांवर बोलताना लोकशाहीच्या मंदिरात आतापर्यंत झालेल्या कमाकजाची गौरवगाथा सांगितली. एवढेच नव्हे तर, ते म्हणाले की, ‘मी कधी कल्पना सुध्दा केली नव्हती. परंतु, ही लोकशाहीचीच ताकद आहे की रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकणारा मुलगा संसदेत पोहचला’. संसदेच्या विशेष अधिवेशनाला सोमवार, १८ सप्टेंबर पासून सुरूवात झाली. अधिवेशन २२ सप्टेंबरपर्यंत अर्थात पाच दिवस चालणार आहे. महत्वाचे म्हणजे, संसदेचे कामकाज आज जुन्या इमारतीत झाले. परंतु, उद्यापासून म्हणजेच मंगळवार, १९ सप्टेंबर पासून संसदेचे कामकाज नवीन इमारतीत होणार आहे. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय प्रवासाची सुरुवात, उपलब्धी, अनुभव, आठवणी आणि त्यातून मिळालेले धडे या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. सभागृहाचे कामकाज मंगळवार पासून नवीन इमारतीत हलविण्यात येणार असल्याचा उल्लेख सुध्दा त्यांनी मोठ्या अभिमानाने केला. यावेळी ते खूप भावूक झाले होते.
विद्यमान खासदारांना इतिहास आणि भविष्याचा दुवा बनण्याची संधी
पंतप्रधान म्हणाले की, वर्तमान खासदारांना इतिहास आणि भविष्याचा दुवा बनण्याची संधी मिळाली आहे. ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कारण इतिहास आणि भविष्य या दोन्हींचा दुवा बनण्याची संधी आपल्याला मिळत आहे. काल आणि आज जोडण्याची संधी मिळत आहे. उद्या आपण प्रचंड उत्साह, उर्जा घेऊन येथून जाणार आहोत आणि नवीन इमारतीत प्रवेश करणार आहोत. सभागृहाने दिलेली प्रेरणा आणि नवा आत्मविश्वास आपण घेऊन जाणार आहोत. आज मला त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वेळ दिला याबद्दल मी आभारी आहे. या पृथ्वीला आणि या सभागृहाला माझा सलाम.
पंतप्रधान म्हणाले की, याच सभागृहात आण्विक कराराला मंजुरी देण्यात आली होती आणि याच सभागृहाने कलम ३७०, वन पेन्शन वन टॅक्स…जीएसटी, वन रँक-वन पेन्शनही यासारखे विधेयक पारीत केलेत. गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही येथे घेण्यात आला. भारताच्या लोकशाहीत आपण अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि आपली संसद लोकशाहीची ताकद आहे आणि हे मंदीर त्याचे साक्षीदार आहेत. जेमतेम चार खासदार असलेला पक्ष सत्तेत असताना आणि १०० खासदार असलेला पक्ष विरोधकाच्या बाकावर बसला असतानाचे दृष्य सुध्दा या सभागृहाने बघितले आहे. अवघ्या एका मताने अख्खं सरकार पडत असल्याचे दृष्य सुध्दा या सभागृहाने बघितले आहे. नरसिंह राव घरी जाण्याच्या तयारीत होते पण पुढील पाच वर्षांसाठी देशाचे पंतप्रधान झालेत ही ताकद याच सभागृहाची होती.
पंतप्रधान मोदी यांनी भुतकाळातील आठवणींना उजाळा देताना सांगितले की, २००० मध्ये अटलजींच्या सरकारमध्ये उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या तीन राज्यांची निर्मिती झाली. याचा आनंद सर्वांनी साजरा केला. हे राज्य झाले तेव्हा उत्तरप्रदेशही आनंदात होता आणि उत्तराखंड सुध्दा आनंद साजरा करीत होता. मध्यप्रदेश आनंदी होता आणि छत्तीसगडही आनंदी होता. बिहारमध्ये बहार आली होती आणि झारखंड सुध्दा बहरला होता. मात्र, याच सभागृहाने आंध्रप्रदेशमधून तेलंगणा हे वेगळे राज्य बनविले. तेव्हा मात्र, दोन्ही राज्यांत क्रंदन ऐकायला येत होते. दोन्ही राज्यांत हिंसा होत होती. सकारात्मकता आणि नकारात्मकता यातील फरक सुध्दा या संसदेने बघितला आहे. या सभागृहाने कॅन्टीनमध्ये दिलेली सबसिडी रद्द केली आणि याच सभागृहातील सदस्यांनी खासदार निधीचे पैसे कोविडच्या काळात सार्वजनिक हितासाठी दिले.
पंतप्रधान मोदींनी संसदीय इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांची दिली माहिती
ते म्हणाले, पंडित नेहरूंच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना देशात बेस्ट प्रॅक्टीसच्या दिशेने खूप चांगले काम झाले. देशात सामाजिक समतोलाचे वातावरण निर्माण करण्यासाठी औद्योगिकीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब यांनी आणलेले औद्योगिक धोरण आजही त्याचे उदाहरण आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी ६५ च्या युद्धात देशाच्या सैनिकांना याच सदनातून प्रेरणा दिली होती आणि येथूनच त्यांनी हरित क्रांतीचा पाया घातला होता. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली या सभागृहात बांगलादेश मुक्तीसाठी आंदोलन आणि त्याला पाठिंबाही दिला गेला. याच सभागृहात आणीबाणीच्या रूपाने देशातील लोकशाहीवरही हल्ला झाला होता. मतदानाचे वय २१ वरून १८ पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल हे सभागृह सदैव ऋणी राहील. याच सभागृहाने देशात कितीतरी आघाडी सरकारे बनत असल्याचे बघितले आहे.
२००१ च्या दहशतवादी हल्ल्यातून ज्यांनी खासदारांना वाचवले त्यांना सलाम
लोकशाहीच्या या मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा आपल्या आत्म्यावरील हल्ला होता, हा देश कधीही विसरू शकत नाही. ज्यांनी लोकप्रतिनिधींना वाचवण्यासाठी स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलल्या त्यांनाही मी आज सलाम करतो. आज जेव्हा आपण या सदनातून बाहेर पडत आहोत, तेव्हा देशाला प्रत्येक क्षणाची माहिती देणाऱ्या पत्रकारांनाही माझा सलाम. त्यांची क्षमता अशी होती की ते आतली माहिती पोहोचवू शकत होते… त्यांनी सभागृहातून भारताचा विकास प्रवास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची लोकशाहीची एक महत्त्वाची शक्ती बनल्याचे स्मरण करण्याचीही आज वेळ आहे.
आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी संसदेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले. ते म्हणाले, “आम्ही लोकप्रतिनिधी आपापल्या भूमिका बजावतो, पण आमच्यातही एक गट आहे, ज्यांच्या अनेक पिढ्या बदलल्या आहेत, जे आमच्याकडे कागदपत्रे सोपवायला धावतात. त्यांच्या कामानेही गुणवत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यांनी भूमिका बजावली आणि मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. कोणी साफसफाई केली, कोणी सुरक्षा केली, अशा असंख्य लोकांनी आम्हाला चांगले काम करण्यास मदत केली. आमच्या वतीने मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करू इच्छितो. मी अभिनंदन करतो.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “नेत्यांची सेंट्रल बिल्डिंगशी एवढे घट्ट नाते आहे आहे की विद्यमान खासदार नसतानाही ते सेंट्रल हॉलमध्ये येत असतात. या इमारतीत दोन वर्षे ११ महिने संविधान सभा झाली आणि ती देशाला मार्गदर्शक राज्यघटना दिली.गेल्या ७५ वर्षात देशवासीयांचा संसदेवरील विश्वास वाढत चालला आहे. लोकांचा या संस्थेवर अतूट विश्वास हे लोकशाहीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. पंडित नेहरू, शास्त्रीजी, अटलजींपासून जी, मनमोहन सिंग, मोठ्या संख्येने लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. सेवा केली आणि देशाला नवी दिशा दिली. आज त्यांची स्तुती करण्याची वेळ आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल, लोहिया जी यांनी आवाजाला बळ देण्याचे काम केले आहे. या सदनात कधी उत्साहाच्या क्षणी सभागृहाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्यांच्या कार्यकाळात तीन पंतप्रधान गमावल्याचे दु:ख देशाला सहन करावे लागले होते.त्यानंतर अश्रू ढाळत निरोप देण्यात आला.
“आज जेव्हा आपण हे सदन सोडून नवीन इमारतीत जात आहोत, तेव्हा मला काही गोष्टींची खूप आठवण येत आहे. मी जेव्हा पंतप्रधान झालो तेव्हा मी सभागृहाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवले. प्लॅटफॉर्मवर राहणारा संसदेत पोहोचला. मी कधीच कल्पना केली नाही. हा देश इतका आदर आणि प्रेम देईल असे वाटले नव्हते. या सभागृहात समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधी दिसतात आणि समाजातील सर्व स्तरातील लोक आहेत. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. २५ वर्षांच्या चंद्राणी मुर्मू या सभागृहातील सर्वात तरुण सदस्य आहेत. अनेक संकटे आणि अडचणी असतानाही खासदारांनी संसदेत येऊन शारीरिक समस्या असतानाही आपले लोकप्रतिनिधीचे कर्तव्य बजावले आहे. अनेकांनी व्हीलचेअरवर येऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली आहे. कोविड काळात आमचे खासदार सभागृहात आहेत, परतले आहेत.
(हेही वाचा – Lower Paral Delil Bridge : लोअर परळच्या ‘त्या’ पुलाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला)
जुने संसद भवन हा आपला समान वारसा आहे
पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा खूप भावनिक क्षण आहे. जेव्हा आपण जुने घर सोडून नवीन घरात जातो तेव्हा अनेक आठवणी काही क्षणांसाठी हेलावून जातात. हा आपल्या सर्वांचा समान वारसा आहे.”
जी-२० ने देशाची प्रतिष्ठा वाढवली : पंतप्रधान मोदी
जी-२० च्या यशाचे या सभागृहात सर्वानुमते कौतुक करण्यात आले आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जी-२० चे यश हे भारताचे यश आहे, कोणत्याही व्यक्तीचे किंवा गटाचे यश नाही. भारताच्या फेडरल रचनेने ६० ठिकाणी २०० हून अधिक परिषदा मोठ्या वैविध्य आणि भव्यतेसह आयोजित केल्या आहेत आणि संपूर्ण जगावर त्याचा प्रभाव पडला आहे. यामुळे देशाची शान वाढणार आहे. याचा भारताला अभिमान वाटेल. सभापती महोदय, आज भारत जागतिक पटलावर आपले स्थान निर्माण करत आहे. याचे कारण म्हणजे आपली मूल्ये, सबका साथ, सबका विकास हा मंत्र जगाला आपल्याशी जोडत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community