Manipur : जवानाचे अपहरण करून हत्या

183
Manipur : जवानाचे अपहरण करून हत्या

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर (Manipur) येथील परिस्थिती बिघडलेली आहे. कुकी आणि मैतेई यांच्यात सुरू असलेली हिंसा अद्यापही थांबायचे नाव घेत नाही. येथे थोड्या बहुत शांततेनंतर पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. संरक्षण करणाऱ्या जवानांवरही हल्ले केले जात आहेत. अशातच आता एका भारतीय जवानाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये (Manipur) एका भारतीय जवानाचे अपहरण करून, त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा जवान सुट्टीवर आपल्या घरी आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जवानाचा मृतदेह रविवारी (१७ सप्टेंबर) इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात आढळला. संबंधित जवानाचे नाव सीपॉय सेर्तो थांगथँग कोम असे होते. ते आर्मीच्या डिफेन्स सिक्योरिटी कोर प्लाटूनमध्ये कांगपोक्पी येथील लिमाखोंगमध्ये तैनात होते. ते पश्चिमी इंफाळमधील तारुंग येथील रहिवासी होते. संबंधित जवानाचे अपहरण झाले, तेव्हा त्याचा चिमुकलाही तेथेच होता.

(हेही वाचा – Cobra Commando : जम्मू-काश्मीरमध्ये कोब्रा कमांडोची तुकडी पहिल्यांदाच तैनात)

सकाळच्य सुमारास घडली घटना

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपॉय कोम सुट्टीवर आपल्या घरी (Manipur) आले होते. सकाळच्या सुमारास १० अज्ञात शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय कोम यांचे त्यांच्या घरून अपहण केले. केवळ त्यांचा १० वर्षांचा मुलगाच या संपूर्ण घटनेचा प्रत्यक्ष साक्षिदार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने सांगितले आहे की, तीन लोक त्यांच्या घरात शिरले होते. तेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत घरात काम करत होता. शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय यांच्या डोक्याला पिस्तुल लावले आणि त्यांना एका पांढऱ्या वाहनात बसून नेले. लष्करातील जवानांना सीपॉयच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.