Indian Navy : नौदलाची ताकद वाढणार; चीनला टक्कर देणाऱ्या कोणकोणत्या युद्धसामग्रींचा होणार समावेश, जाणून घ्या…

216

सातत्याने हिंदी महासागरात कुरघोड्या करणाऱ्या चीनचा बंदोबस्त करण्यासाठी भारत समुद्री ताकद आणखी वाढवणार आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा युद्धनौका सामील करण्यात येणार आहेत. हिंद महासागर आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात आगामी काळातील कुरघोडींचा धोका पाहता भारतीय नौदलाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

केंद्राकडून नौदलाला (Indian Navy) 143 विमाने आणि 130 हेलिकॉप्टर तसेच 132 युद्धनौका खरेदीची परवानगीही मिळाली आहे. याशिवाय 8 नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट्स म्हणजेच लहान युद्धनौका, नऊ पाणबुड्या, पाच सर्वेक्षण जहाजे आणि दोन बहुउद्देशीय जहाजे बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. येत्या काही वर्षांत हे तयार केले जातील.  2030 पर्यंत नौदल आणखी मजबूत होऊन 155 ते 160 युद्धनौका असतील.

(हेही वाचा Manipur : जवानाचे अपहरण करून हत्या)

भारत आणि चीनमध्ये सीमासंघर्षासोबतच सागरी क्षेत्रातही संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये हिंद महासागर क्षेत्रात स्पर्धा आहे. भारत सध्या लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर देत असताना नौदलाची (Indian Navy) ताकद वाढवण्याचाही प्रयत्न करत आहे. भारतीय नौदलाने 68 युद्धनौका आणि जहाजांचा प्रस्ताव मंजूर केला असून त्यांची ऑर्डरही देण्यात आली आहे. नौदलामध्ये आगामी काळात 2 लाख कोटी रुपये किमतीची आधुनिक जहाजे आणि युद्धनौका यांचा समावेश होईल.

175 युद्धनौका नौदलात समावेश करण्याचे लक्ष्य

भारतीय नौदलाचे (Indian Navy) खरे उद्दिष्ट 2035 पर्यंत आपल्या ताफ्यात किमान 175 युद्धनौका समाविष्ट करणे आहे. यामुळे हिंदी महासागरातील भारताची पोहोच आणखी मजबूत करता येईल. तसेच यासोबतच नौदलाची विमाने, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोनची संख्या वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.