World Cup 2023 : आशिया चषकावर नाव कोरून भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज

179
World Cup 2023 : आशिया चषकावर नाव कोरून भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज

विश्वचषकाआधी (World Cup 2023) भारतीय संघाने आशिया चषकावर आपलं नाव कोरून पुन्हा एकदा आपणच आशियाचा किंग असल्याचे सिद्ध केले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव केला. या सामन्यात मोहम्मद सिराज याने सहा विकेट घेतल्या. या विजयामुळे भारतीय संघाचा विश्वचषकातील प्रवास सुकर झाल्याचे दिसून येत आहे. येत्या पाच ऑक्टोबर २०२३ पासून भारतामध्ये विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आठ ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.

ऑक्टोबर ५ पासून भारतात वर्ल्ड कप २०२३ (World Cup 2023) ची सुरुवात होणार आहे. विश्वचषकाआधी रोहित आणि कंपनीवर दबाव होता. मात्र आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर तो दबाव कमी झाला आहे.

(हेही वाचा – Indian Navy : नौदलाची ताकद वाढणार; चीनला टक्कर देणाऱ्या कोणकोणत्या युद्धसामग्रींचा होणार समावेश, जाणून घ्या…)

आशिया चषकाच्याआधी भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या (World Cup 2023) तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. रोहित शर्माच्या कर्णधारपद आणि फलंदाजीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. तसेच चौथ्या क्रमांकावरील फलंदाजी ही पुन्हा एकदा भारतीय संघाची समस्या झाली होती. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात के एल राहुलने शतक झळकावून ती समस्या देखील दूर केली. त्यामुळे भारतीय संघ आता विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.