Collapse Kharif Season : खरिपाच्या हंगामाला अनुकूल वातावरण नाही, बाजरीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

158
Collapse Kharif Season : खरिपाच्या हंगामाल अनुकूल वातावरण नाही, बाजरीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता
Collapse Kharif Season : खरिपाच्या हंगामाल अनुकूल वातावरण नाही, बाजरीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

खरिपाच्या हंगामासाठी ( Collapse Kharif Season ) यावर्षी अनुकूल वातावरण मिळाले नाही. पाऊसही पुरेसा न पडल्याने दौंड तालुक्यात कोठेही बाजरीच्या पिकाच्या पेरण्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गत वर्षी खरीप हंगामातील मुख्य मानली जाणारी यावर्षीची नवीन बाजरी बाजारात येणार की नाही तसेच बाजरीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Maharashtra Politics : शिवसेना निवडणूक चिन्हाची सुनावणी लांबणीवर )

यावर्षीची नवीन बाजरी बाजारात आली नाही, तर शेतकरी आणि ग्राहकांना प्रतिक्विंटल दराने मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. केडगाव येथील खेरदी-विक्री उपबाजारात आजमितीला बाजरी ही २ हजार ते २ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली जात आहे. यावर्षी पाऊसच झाला नसल्याने केडगाव उपबाजार संघाला राजस्थानातून २ हजार ७०० प्रतिक्विंटल दराने बाजारी आयात करावी लागणार आहे. खरिपाच्या हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, ऊस, हरभरा, भुईमूग, मूग, उडीद, चवळी, तीळ, गवार, भेंडी, सोयाबीन, रताळे ही पिकेदेखील अगदी नगण्य प्रमाणात घेण्यात आली आहेत.

खरीप हंगाम वाया गेला असून, आता रब्बीचा हंगमा सुरू होत आहे, पण पाऊसच पडत नसल्याने शेतकरी पेरणी कशी करायची, या विचारात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.